Headlines

री-नीटचा निकाल योग्य असल्याचे सिद्ध:4 विद्यार्थ्यांना खंडपीठाचा दंड, पाहणीत मूळ उत्तरपत्रिका अन् एनटीएचे गुण तंतोतंत जुळले

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या री-नीटच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या ४ याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५,००० रुपये दंडात्मक खर्च ठोठावला आहे….

Read More

नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के:6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत. गुरुवारच्या भूकंपाचा…

Read More

ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा:पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी कथित बांधकाम अनियमिततेच्या प्रकरणात आनंदराव मलगुंडे…

Read More

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी आढावा बैठक:महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेण्यात आला

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील रस्ते स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे याबाबत सविस्तर…

Read More

विद्यापीठाचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदतीचा हात:शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती, 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती, विद्याधन योजना, स्व. प्रा. रामप्रकाश श्यामलाल राठी स्मृती शिष्यवृत्ती योजना, संत गाडगे बाबा शिक्षण संरक्षण योजना, विद्यार्थिनी बस पास सवलत योजना आणि संत गाडगे बाबा कमवा व शिका योजना यांचा समावेश आहे. शैक्षणिक सत्र…

Read More

युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:'नीट' नंतर FDA परीक्षेत घोळ, कठोर कारवाईची मागणी

‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतही घोळ झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने गुरुवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद…

Read More

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, मेघा नदीला पूर:शिरसगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा येथील पूर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावाजवळून वाहणारी मेघा नदी आणि ब्राम्हणवाडा थडी गावातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शिरसगाव कसबा परिसरात काहीशी चिंतेची स्थिती होती. नदीकाठावर आणि आसपासच्या…

Read More

तृतीयपंथीयांसाठी रोजगाराचा नवा मार्ग:जिल्हाधिकारी कार्यालयातील 'आपले सरकार' सेवा केंद्र चालविण्याची संधी – जिल्हाधिकारी गुप्ता

तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र चालविण्याची संधी देण्यात येणार असून, यामुळे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी ता ३० दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक न्याय विभाग आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

Koyna Dam Gates Opened; Flood Alert Issued for Maharashtra Riverbanks

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (३० जुलै) सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. यामुळे कोय . कोयना धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडण्यात आले. या दरवाजांमधून ५,०७९ क्युसेक…

Read More

सावनेरमध्ये भीषण अपघात:रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, रुळावरून जाताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर धावत्या ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी १०:१५ वाजता ही दुर्घटना घडली. निरंजन लक्ष्मण फिरके (वय ४०) आणि योगेश लक्ष्मण फिरके (वय ३७, दोघे रा. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे फिरके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सावनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….

Read More