Headlines

Chhagan Bhujbal Slams Authorities Over Nashik Pothole Deaths

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . एकाला 10 लाख दिले, तशीच मदत सर्वांना द्या खड्ड्यांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा थेट…

Read More

राज्यात पावसाचे थैमान! सलग आठव्या दिवशीही मुसळधार:PHOTO आणि VIDEO च्या माध्यमातून पाहा राज्यातील पूरस्थिती…

राज्यात सलग आठव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जळगाव, संपूर्ण विदर्भ आणि नांदेडच्या किनवट तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हवामान विभागाने नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर छत्रपती संभाजीनगरसह…

Read More

हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट…

Read More

हिंगोलीकरांना दिलासा:शहरात कयाधू नदीचे खोलीकरण झाल्याने पुराचा धोका कमी

हिंगोली शहरालगत कयाधूू नदी पात्राचे खोलीकरण झाल्यामुळे मागील चोविस तासात झालेल्या मुसळधार पावसातही परिसरातील पुराचा धोका कमी झाल्याने नागरीकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. या शिवाय नदीच्या पात्रात पाणी साठवणुकीत वाढ झाल्याचे चित्र आहे. हिंगोली शहरालगत कयाधू नदी वाहते. या नदीचे पात्र उथळ असल्याने पडलेला पाऊस वाहून जातो या शिवाय खोलीकरणा अभावी अरुंद झालेल्या…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:51 वर्षीय नराधमाला अटक

अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. विठ्ठल मुरलीधर फरतारे (वय ५१, रा. मोहोज देवडे, ता. पाथर्डी, सध्या रा. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ जुलै रोजी पीडित मुलीच्या…

Read More

संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला:दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधाबद्दल विज्ञानाचे नोबेल द्या, शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देण्यासही विरोध

“दगडावरचे हातांचे ठसे घेऊन ते आधार कार्डला लिंक केले जातील, हा चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध अत्यंत मोठा आहे. अशा प्रकारचा शोध आतापर्यंत कोणीही लावला नव्हता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करून चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधनातील ‘नोबेल पुरस्कार’ द्यायला हवा,” असा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…

Read More

टाळ-मृदंगाचा निनाद अन् विठूनामाचा गजर:गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडी सोहळा!

कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘विठ्ठल… विठ्ठल…’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला सर्वोच्च स्थान असून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंचे महत्त्व लहानपणापासूनच रुजावे तसेच गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि…

Read More

श्रीरामपूर-बेलापूर मार्गावर पुन्हा सुरू झाली वृक्षलागवड:‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग, वृक्षप्रेमींमध्ये समाधान, मात्र झाडे जगवण्याचे आव्हान‎

अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ हा सहा किलोमीटरचा रस्ता चौपदरी करणे आवश्यक होते. मात्र, या रस्ता रुंदीकरणादरम्यान वडाच्या जुन्या झाडांसह शेकडो झाडे तोडली गेली. त्यानंतर प्रशासनाने झाडे लावली खरी, परंतु पाणीटंचाई व दुर्लक्षामुळे रखरखत्या उन्हात ती सर्व झाडे जळून खाक झाली होती. या गंभीर प्रकाराबाबत ‘दिव्य…

Read More

बुवासिद्ध देव यात्रा:कावड निघाली… राहुरी दुमदुमली! कावड, झेंडा मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देवांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण राहुरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला….

Read More

अपघात:ट्रक-एसटीची समोरासमोर धडक; एक ठार, ७ जखमी

दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रक आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. दर्यापूर येथून हिंगणघाटकडे जाणारी एसटी बस लखापूर फाटा व आराळा फाटा दरम्यान पोहोचली असता,…

Read More