Headlines

जरांगेंवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही:गरज पडल्यास त्यांची भेट घेणार : मंत्री राधाकृष्ण विखे

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेवढे निर्णय घेतले, असे निर्णय यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ…

Read More

बळीराजाला दिलासा:राहुरीत रिमझिम पावसामुळे खरीप पिके तरारली

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने या पावसाने राहुरी तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असताना रिमझिम पावसावर उभ्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकरी रिमझिम पावसावर दिलासा मिळाल्याने सुखावला आहे. मुळा धरणातील आवक चांगली सुरू आहे. तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत उशिरा…

Read More

चांदवड:सफाई कामगारांच्या आर्थिक शोषणाची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदेंकडे

येथील नगरपरिषद हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या सफाई कामगार व महिला मजुरांचे ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून नगरविकास विभागामार्फत या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई…

Read More

मोठा अनर्थ टळला:शरणापूर फाट्यावर बस दुभाजकावर चढली

नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणारी वैजापूर-संभाजीनगर प्रवासी बस अचानक शरणापूर फाटा येथे रस्त्यावरील डिव्हायडरवर चढल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने समोरील अपघात टाळण्यासाठी चालकाने तातडीने ब्रेक मारले, ज्यामुळे बस डिव्हायडरवर चढली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये…

Read More

पायी दिंडी:महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग दर्शन पायी दिंडीचे जाफराबादला स्वागत

जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील जनार्दन स्वामी यांच्या प्रेरणेने श्री ज्ञानेश्वर आश्रमाचे परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडीचे जाफराबाद शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. जयघोष झाला. टाळ-मृदंगाचा गजर झाला. भक्तिमय वातावरणात नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. ३१ जुलै रोजी जवखेडा ठेंग येथील श्री ज्ञानेश्वर आश्रमातून सुमारे ५०…

Read More

विद्यापीठात 10 ऑगस्टपासून हेल्मेट नसेल तर नसणार एन्ट्री:दुचाकीचालकांसह मागे बसणाऱ्यालाही सक्ती; प्रशासनाचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्टपासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता केवळ दुचाकीचालकालाच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असेल. हेल्मेट नसल्यास विद्यापीठ परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

Read More

नाशिक, पालघर जिल्ह्यांत सलग 7 व्या दिवशी भूकंप:नाशकात 3.0, तर पालघरला 3.5 तीव्रतेचा धक्का

नाशिक व पालघर जिल्ह्यांत शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. गत सातव्या दिवसातील हा १२ वा भूकंप होता. नाशिकला ३१ जुलै रोजी पहाटे ३.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू दिंडोरी येथे भूगर्भात ७ किमी खोलीवर होता. दुसरीकडे, पालघर जिल्ह्याला सायंकाळी ४.४७ वाजून ४५ सेकंदांनी ३.५ रिश्टर स्केचा धक्का बसला. केंद्रीय समिती सोमवारी कळवणला देणार भेट नाशिकच्या…

Read More

दिव्य मराठीच्या सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक:म्हणाले – असा कॉन्क्लेव्ह प्रथमच पाहिला, संस्कृती जपणारेच असे उपक्रम राबवतात

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे मुंबईत आयोजित ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’ मध्ये ते बोलत होते. सिंहस्थ हा केवळ धार्मिक मेळा नसून भारताच्या अध्यात्म, संस्कृती आणि सनातन परंपरेचे…

Read More

डॉ. हेडगेवार निवासावर विशेष आवरण, माहिती पुस्तिकेचे लोकार्पण:सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थान ‘डॉ. हेडगेवार निवास’ वर आधारित विशेष आवरण, माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मोहर यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. भारतीय टपाल विभाग, नागपूरद्वारे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, डॉ. हेडगेवार आणि संघ हे…

Read More

पालकमंत्री असो वा नसो, नाशिकसाठी मी कायम हजर:40 हजार कोटींतून 'मॉडर्न नाशिक' साकारणार – गिरीश महाजन

पालकमंत्री असो अथवा नसो, संकटकाळात आणि शहराच्या विकासासाठी मी नाशिकमध्ये नेहमीच हजर असतो. येत्या सहा महिन्यांत नाशिक शहरातील सर्व रस्ते आणि प्रलंबित कामे पूर्ण केली जातील, असा ठाम विश्वास राज्याचे ग्रामविकास व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांना थेट इशारा देत “आता कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली…

Read More