पुण्यात चार गावठी पिस्तुले जप्त:विक्रीसाठी आणलेल्या शस्त्रांसह 23 वर्षीय तरुण अटकेत
पुणे शहरात खंडणीविरोधी पथक क्रमांक एकने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेली चार गावठी पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी २३ वर्षीय भूषण उत्तम मोहिते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे शहरातील गोकुळनगर-नऱ्हे परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची एकूण किंमत दोन लाख ६०० रुपये आहे. अटक…