![]()
जिल्ह्यात जुलैचा महिना संपत आला तरी पावसाची विषमता दिसून येते. २९ जुलैपर्यंतच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ६ तालुक्यांमध्ये मान्सूनच्या एकूण सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा आणि राहाता या ६ तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस आहे. जिल्ह्याची एकूण पावसाची टक्केवारी ४७.३ टक्के दिसत असली, तरी ती केवळ काही ठराविक तालुक्यांतील पावसामुळे वाढलेली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रमुख बागायती व जिरायती पट्ट्यात सर्वदूर सारखा पाऊस झालेला दिसत नाही. एकूण सरासरीचा विचार केला तर राहुरीत अवघा १७.३ टक्के, शेवगावमध्ये २६.१ टक्के, श्रीरामपूरमध्ये २८.४ टक्के, पाथर्डीत २९.३ टक्के, नेवाशात ३२.८ टक्के आणि राहाता तालुक्यात ३८.१ टक्के पाऊस झाला. राहुरीत अवघा १७.३% पाऊस जिल्ह्यात सर्वात गंभीर आणि भीषण परिस्थिती राहुरी तालुक्यात निर्माण झाली आहे. मोसमाचा सरासरी पाऊस ४३१.८ मिमी असताना, जुलैअखेर येथे केवळ ७४.९ मिमी (१७.३%) पाऊस झाला आहे. तर अकोले तालुक्याची मान्सूनच्या पावसाची सरासरी ४८८.५ मिमी असून, तिथे आतापर्यंत तब्बल ४६९.६ मिमी म्हणजेच ९६.१ टक्के पाऊस नोंदवला गेला. ४० टक्केपेक्षा कमी पाऊस असलेल्या शेवगावमध्ये १२०.७ मिमी, श्रीरामपूर १३१.३, पाथर्डी १३८.५, नेवासे १४०.८, राहता १७३ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगली स्थिती आहे. नद्यांतून विसर्ग सुरू बुधवारी सायंकाळी ६ वाजता गोदावरी नदीतून नांदूर मधमेश्वर धरणातून सर्वाधिक १७ हजार २६९ क्युसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. घोड नदीतून घोड धरणात १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.भंडारदरा धरणात ३ हजार ५८,निळवंडे धरणात २ हजार १०१ व ओझर बंधारा येथे १ हजार ८९५ क्युसेक पाणी सोडण्यात आले. २ दिवस पाऊस, वारे तासी ५० कमी वेगाने वाहणार हवामान विभागाने जिल्ह्यात पुढचे २ दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. ३० जुलैला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडट्यासह, वादळी वारेसह पावसाचा अंदाज असून, ताशी ५० कमी वेगाने वारे वाहणार आहे. ३१ जूलैला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
Source link
दमदार पावसाची प्रतिक्षा:6 तालुक्यांत एकूण सरासरीच्या 40 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस