![]()
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रमानगरजवळ परिंदा हॉटेलसमोर कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. प्रतीक संजय कांबळे (२०), सौरभ म्हात्रे (२३, दोघेही रा. बिडकीन, ता. पैठण) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जगद्गुरू रामानंदाचार्य संस्थानच्या रुग्णवाहिका चालकाला अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. कार (एमएच २० एचटी ६६६७) आणि दुचाकी (एमएच २० एफएन ७८५७) यांच्यातील धडकेमुळे मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले होते. जखमी प्रतीक संजय कांबळे व सौरभ म्हात्रे यांना बिडकीन येथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. बुधवारी दुपारी दोन्ही तरुणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील, सहायक फौजदार अशोक सोकटकर आणि बीट जमादार आप्पासाहेब माळी तपास करत आहेत.
Source link
कार-दुचाकीची समोरासमोर धडक:2 तरुणांचा मृत्यू, पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घटना