Headlines

दमदार पावसाची प्रतिक्षा:6 तालुक्यांत एकूण सरासरीच्या 40 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस

जिल्ह्यात जुलैचा महिना संपत आला तरी पावसाची विषमता दिसून येते. २९ जुलैपर्यंतच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील १४ पैकी तब्बल ६ तालुक्यांमध्ये मान्सूनच्या एकूण सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. राहुरी, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा आणि राहाता या ६ तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पाऊस आहे. जिल्ह्याची एकूण पावसाची टक्केवारी ४७.३ टक्के दिसत असली, तरी ती…

Read More

जमिनीवर आपटताच फुटले हेल्मेट:निकृष्ट 3 हजार हेल्मेट साठ्यावर धाड; दिल्ली, राजस्थान, रायपुरातून आणला साठा

शहरात शुक्रवार २४ जुलैपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शहरातील विविध मार्गांवर हेल्मेट विक्रीची तात्पुरती दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. या ठिकाणी सुमार दर्जाचे हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार शहर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी बुधवारी २९ जुलैला संयुक्त कारवाई करत रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील…

Read More

बार्शी टेक्स्टाइल मिल सुरूसाठी मोदींनाच साकडे:ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल शिंदे सेनेच्या 13 खासदारांसोबत पंतप्रधान मोदींना भेटणार‎

कोरोना काळापासून बंद असलेल्या बार्शी टेक्स्टाइल मिलमधील कामगारांचे प्रलंबित वेतन, इतर देयके आणि मिल पुन्हा सुरू करण्याच्या प्रश्नावर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांनी दिली. यासाठी शिवसेनेच्या १३ खासदारांचे शिष्टमंडळ खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे…

Read More

अवघ्या 5 मिनिटांत विद्यार्थ्यांनी सोडवली अवघड गणिते!:अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांना झटपट व अचूक गणित सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. सुखकर्ता लॉन येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह देशभरातील ८७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे आणि दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी…

Read More

महिलेला सर्पदंश:वेळेत उपचारांमुळे अनर्थ टळला

नांदर येथे महिलेला सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. आशा सेविकेच्या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार झाल्याने अनर्थ टळला आहे. हुदाबी जावेद पठाण ( ३३) घरातील काम करत असताना त्यांना साप दिसला. त्यांनी हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश झाल्यानंतरही त्यांनी कोणाला काही न सांगता काम सुरू ठेवले….

Read More

आषाढी एकादशीनिमित्त:लासूरला विठ्ठल नामाच्या गजरात ‘विठ्ठल गीती गावा-2026’ सोहळा

लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी व नवतरुण भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमात बालकलाकारांसह भजनी मंडळाच्या सदस्यांनी संतांचे विविध अभंग सुरेल स्वरात सादर केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

पेपरफुटीच्या मुळावर घाव घालणार:सुरक्षित प्रश्नपत्रिका प्रणाली लागू करू, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश गिते यांचा निर्धार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी संभाजीनगरचे रहिवासी आणि नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकटेश गिते यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याशी दिव्य मराठीने साधलेला संवाद.. प्रश्न : सर्वात पहिले आणि सर्वोच्च प्राधान्य काय असेल? उत्तर : प्रमुख उद्दिष्ट ५ वर्षांत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर ‘टॉप-१००’ विद्यापीठांच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देणे…

Read More

सिल्लोडमधील रस्त्यावर तरुणाचा ‎गळा चिरलेला मृतदेह आढळला:कारण अस्पष्ट, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎

शहरातील भोकरदन रोडवरील एकता‎पेट्रोल पंपाच्या पाठीमागील‎नगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळ‎बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास‎एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा‎गळा शस्त्राने चिरून खून केल्याची‎घटना उघडकीस आली आहे.मृताची‎ओळख अद्याप पटलेली नाही.‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत‎आढळून आल्याने, खुनानंतर पुरावे‎नष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जन‎स्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्त‎होत आहे. डायल ११२ वर मिळालेल्या‎माहितीवरून पोलिस कर्मचारी‎सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनी‎तातडीने घटनास्थळी धाव घेतली….

Read More

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More