![]()
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी संभाजीनगरचे रहिवासी आणि नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकटेश गिते यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याशी दिव्य मराठीने साधलेला संवाद.. प्रश्न : सर्वात पहिले आणि सर्वोच्च प्राधान्य काय असेल?
उत्तर : प्रमुख उद्दिष्ट ५ वर्षांत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर ‘टॉप-१००’ विद्यापीठांच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देणे असेल. प्रश्न : शिक्षणमाफियांना रोखण्यासाठी काय करणार?
उत्तर : या प्रवृत्ती मुळासकट उखडून टाकण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल करू. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित अतिसुरक्षित प्रश्नपत्रिका प्रणाली लागू करू. प्रश्न : विद्यापीठाचा कारभार कसा बदलणार?
उत्तर : लालफीतशाहीला विद्यापीठात अजिबात थारा नसेल. संपूर्ण प्रशासन डिजिटल करून विद्यार्थ्यांसाठी ‘सिंगल विंडो चेन सिस्टीम’ सुरू करण्यात येईल. प्रश्न : विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काय करणार?
उत्तर : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘मेंटॉर-मेंटी’ (पालकत्व) योजना अधिक प्रभावीपणे आणि सक्तीने राबवली जाईल.
Source link
पेपरफुटीच्या मुळावर घाव घालणार:सुरक्षित प्रश्नपत्रिका प्रणाली लागू करू, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश गिते यांचा निर्धार