Headlines

जमिनीवर आपटताच फुटले हेल्मेट:निकृष्ट 3 हजार हेल्मेट साठ्यावर धाड; दिल्ली, राजस्थान, रायपुरातून आणला साठा




शहरात शुक्रवार २४ जुलैपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शहरातील विविध मार्गांवर हेल्मेट विक्रीची तात्पुरती दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. या ठिकाणी सुमार दर्जाचे हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेला मिळाली होती. त्यानुसार शहर वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी बुधवारी २९ जुलैला संयुक्त कारवाई करत रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील एका गोदामावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन हजार निकृष्ट दर्जाची हेल्मेट पोलिसांनी प्राथमिक तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी हेल्मेटची प्राथमिक गुणवत्ता तपासण्यासाठी काही हेल्मेट हातात घेऊन चार ते पाच फूट उंचीवरून जमिनीवर आपटली. धक्कादायक बाब म्हणजे ती हेल्मेट लगेच तडकून फुटली. त्यामुळे संबंधित हेल्मेट सुरक्षा मानकांची पूर्तता करत नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. बसस्थानक ते रेल्वे स्थानक मार्गावरील शितल लॉजलगत असलेल्या गोदामात हा मोठा साठा आढळला. प्राथमिक चौकशीत हा माल दिल्ली, राजस्थान, रायपूरसह इतर शहरातून अमरावतीत विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. या प्रकरणी हेल्मेट विक्री उर्वरित. पान ४ हेल्मेट जमिनीवर आपटताच कसे फुटले, ते दाखवताना पोलिस अधिकारी. गोदामातील हेल्मेटचा साठा पाहताना पोलिस. दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळ हेल्मेट सक्तीचा उद्देश नागरिकांचा जीव वाचवणे हा आहे. मात्र याचा गैरफायदा घेत निकृष्ट हेल्मेट विक्रीसाठी आणली जात असतील, तर हे गंभीर आहे. कमी किंमतीमुळे अनेक नागरिक अशी हेल्मेट खरेदी करतात. परंतु अपघाताच्या वेळी ही हेल्मेट संरक्षण देण्याऐवजी तुटून निष्प्रभ ठरू शकतात. त्यामुळे अशा बनावट, निकृष्ट हेल्मेटची विक्री करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक असून, बीआयएस मानांकनाची दर्जेदार हेल्मेटच खरेदी करावीत. प्रथमदर्शनी हेल्मेट सुमार दर्जाचे आढळून आले ^ शहरातील रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील एका गोदामावर छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा साठा असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. प्रथमदर्शनी ही हेल्मेट बीआयएसच्या सुरक्षा मानकांनुसार तयार झालेली वाटत नाहीत. त्यामुळे बीआयएसच्या अधिकाऱ्यांना अमरावतीत बोलावून या हेल्मेटची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील कारवाई अद्याप सुरू आहे. -प्रांजली सोनावणे, पोलिस उपायुक्त (मुख्यालय), अमरावती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *