Headlines

IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या:दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वसतिगृहात घेतला गळफास, पोलिसांकडून तपास सुरू

देशातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) बॉम्बेमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी रात्री पवई येथील आयआयटी परिसरातील हॉस्टेल क्रमांक 4 मधील खोली क्रमांक ‘जी-4147’ मध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून…

Read More

विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा:दिव्य मराठी ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’मध्ये नाशिकच्या विकासावर मंथन, दिव्य मराठीतर्फे 31 जुलैला मुंबईत आयोजन

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नाशिकचा ब्रँड अधिक भक्कम करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने शुक्रवारी (दि. 31) मुंबईत ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा…

Read More

सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक:एकाविरुद्ध मांजरी पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू

सातबारा उताऱ्यावरून कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी प्रसाद उद्धव शिरसाठ (वय 50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नाव त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावरून कमी झाले…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात जय्यत तयारी:भाविकांच्या गर्दीचे चोख नियोजन, अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाची सोय

श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बुधवारी पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले करण्यात आले आहे. नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत….

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut & Rohit Pawar Over Mughal History Row

मुघलांचा आणि अब्दालीचा इतिहास अभ्यासक्रमातून हटवण्यात आला आहे यामुळेच राऊतांचे पोट दुखत आहे. आपल्या आकांचा इतिहास पुस्तकांमधून हटवला याचा राग संजय राऊत यांच्यासह त्यांच्या लोकांना झाला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा इतिहास शिक . नवनाथ बन म्हणाले की, शिक्षणाच्या आयचा घो असे ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांच्या पक्षाच घो घो झाला आहे….

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:9 जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग! मुख्य अभियंत्यासह दोन बडे अधिकारी निलंबित

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असून, अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्याविरुद्धही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…

Read More

कात्रज मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू:ट्रक चालकाला बेड्या, हडपसर परिसरात घरफोडी

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, तो फिरस्ता असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ट्रक चालक विठ्ठल चांदराव गायकवाड (वय ३८, रा. पुरकी, चिमकी फाटा, चाकण, जि….

Read More

विमा लॉबीने पर्जन्यमापकात बर्फाच्या बाटल्या ठेवून पाडला बनावट पाऊस:कारण- पीक विमा योजनेच्या मोठ्या लाभासाठी जालना जिल्ह्यात बनवाबनवीकसे केले

पीकविमा योजनेत भरपाई मिळवण्यासाठी हवामान आधारित ट्रिगर आवश्यक असते. हे ट्रिगर कृत्रिमरीत्या सक्रिय करण्याच्या उद्देशाने जालना 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये छेडछाड केली. काही पर्जन्यमापकांमध्ये बर्फाने भरलेल्या बाटल्या ठेवल्या. फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी कार्यरत असलेल्या लॉबीने हा प्रकार केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले. हवामान केंद्रांवर पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची…

Read More

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न:दगडफेक अन् वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी- गिरीश महाजन

तरुणांनी छेडलेल्या आंदोलनाचा राजकीय फायदा कसा उठवता येईल, या हेतूने काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि गुंड आंदोलनात घुसून हुल्लडबाजी करत असल्याचे देशाने पाहिले आहे. या प्रकरणी झालेल्या अटकेत ज्यांचा शाळा-कॉलेजांशी दूरवरचाही संबंध नाही, अशा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अशा असामाजिक घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन…

Read More

झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडावा- शिंदे:पर्यावरण, साहित्य आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम

माणूस निर्जीव मूर्तीची श्रद्धेने पूजा करतो; मात्र प्राणवायू, सावली, फळे आणि औषधे देणाऱ्या सजीव झाडांकडे दुर्लक्ष करतो. झाडांमध्येही जीव आणि संवेदना आहेत. त्यामुळे केवळ वृक्षारोपण करणारा नव्हे, तर झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी केले. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या देहरे येथील मनगाव…

Read More