Headlines

12 लाख रुपयांत विशेष परीक्षा केंद्र; महिलेचा ऑडिओ व्हायरल:इंजिनिअरिंग प्रवेश प्रकरण, सीईटीची सायबर सेलकडे तक्रार

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका महिलेने १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात ‘विशेष’ परीक्षा केंद्र देऊ केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सीईटी सेलने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, अनेक विद्यार्थी, पालक आणि विरोधी पक्ष काँग्रेसने अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेच्या (एमएच-सीईटी) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परभणी जिल्ह्यातील पालक…

Read More

अवैध खनिज उत्खनन केल्यास 10 पट दंड:परभणी, नांदेडसह 5 जिल्ह्यांत ‘ॲट्रॉसिटी’साठी विशेष न्यायालये, पुण्यात एनडीपीएस कोर्ट, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात प्रशासकीय पारदर्शकता, न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. वाढत्या अवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत दहा पट वाढ करण्याचा अत्यंत कठोर निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत सुधारणा…

Read More

दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला:अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासकामांच्या चर्चेचा दावा

राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित…

Read More

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा:मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे…

Read More

NHM चे 525 कर्मचारी कायम होण्याचा मार्ग मोकळा:प्रदीर्घ लढ्याला यश, 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांची यादी शासनाकडे

अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश मिळाले असून, यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे कर्मचारी ‘एकच नारा…कायम करा’ या घोषणेसह आंदोलन करत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी तब्बल दोन महिन्यांचा संप पुकारला होता आणि जिल्हा परिषदेसमोरच ‘काळी…

Read More

दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी अभियान सुरू:प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र, 9 महिने फिरणार कार्यकर्ते

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. अमरावती येथून सुरू झालेले हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नऊ महिने चालणार आहे. अभियानाचे प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल…

Read More

उबाठा नेत्याच्या सुनेचे कौटुंबिक छळाचे आरोप:विनायक राऊतांनी कोर्टात व्हॉट्सॲप चॅट्स अन् परदेश दौऱ्यांचे पुरावे केले सादर, कोर्टात काय घडले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांचीच सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ आणि जादूटोण्याच्या नावाखाली त्रास दिल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे हायप्रोफाइल प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील…

Read More

Drugs Free Maharashtra Campaign; Anti-Drug Committees In Schools & Colleges

राज्यातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राबविण्यात येणाऱ्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा विस्तार आता संपूर्ण महाराष्ट् . नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात…

Read More

पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री गाय चोरी:रस्त्यावर बसलेली गाय चोरट्यांनी कारमध्ये घालून पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवड मध्ये मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या सुमारे २० हजार रुपये किमतीच्या गायीची तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना पिंपरी गावातील वैभवनगर परिसरात मंगळवारी (दि. २८ जुलै) पहाटे घडली. गाय चोरीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित…

Read More

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना टाळे:निपुण हिंगोली अभियानाला चपराक, शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी टाळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे. हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात गुणवत्ता वाढीच्या नावाखाली विविध…

Read More