Headlines

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा:पहिल्या टप्प्यात 13,600 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी ऑगस्टमध्ये; नाव नसल्यास तक्रारीचे आवाहन

राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार…

Read More

अहिल्यादेवी यांच्या शौर्यावर स्पर्धा:इतिहास महाराष्ट्राचा-2026 अमरावती प्राथमिक फेरी 2 ऑगस्टला‎

बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या राज्यस्तरीय महोत्सवाची अमरावती येथील प्राथमिक फेरी रविवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, गांधी चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीचा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थी एकपात्री, नाट्यछटा, स्वगत आणि नाटूकलेच्या…

Read More

पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?:हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षणाच्या मंदिरात बोगसगिरीचे दुकान विद्येचे…

Read More

राज्यात वरुणराजाचे दमदार कमबॅक:विदर्भात ऑरेंज तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट; नागपूर-गडचिरोलीत शाळांना सुट्टी

राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भाला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, मुंबई, कोकण आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य धोका पाहता गडचिरोली तसेच नागपूरमधील शाळा-महाविद्यालयांना आज प्रशासनाकडून…

Read More

बालगायक, कलाकारांनी गाजवला ‘भक्तीरंग अभंग गायन’ कार्यक्रम:राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समितीचा उपक्रम‎

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समितीच्यावतीने “भक्तीरंग’ या सदराखाली “वाचे विठ्ठल गाईन’ बाल गायक-कलाकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले. बाल गायकांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून वंदनीय राष्ट्रस . अध्यक्षस्थानी गुणवंतराव जानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून हरणे, अविनाश डुडुल, भा. ना. राऊत, प्रा. हरिदास गहुकर, भीमराव गावंडे, गंगाधरराव पाटील, मंगेश कराळे, डॉ….

Read More

नो एन्ट्रीत घुसलेल्या ट्रकची दुचाकीला धडक:उच्चशिक्षित तरुणीसह मावशीचा जागीच मृत्यू, राजापेठेत गद्रे चौकातील उड्डाणपुलावर अपघात चिरडणाऱ्या ट्रकला नंबर प्लेट नव्हती‎

. शहरातील राजापेठ परिसरातील गद्रे चौकातील उड्डाणपुलावर एका बेलगाम ट्रकने काळजाचा थरकाप उडवणारा तांडव घातला. नो एन्ट्री असतानाही नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या या ट्रकने एका दुचाकीला धडक देवून २७ वर्षांच्या उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या मावशीला चिरडले. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात मंगळवारी २८ जुलैला दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास घडला….

Read More

घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय बालकावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने केला हल्ला:बागरोजा हडको परिसरातील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बागरोजा परिसरातील जुन्या साताळकर हॉस्पिटल परिसरात घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने मंगळवारी दुपारी हल्ला केला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईन . बागरोजा परिसरातील एक तीन वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना मोकाट कुत्र्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घालून हल्ला केला. यात बालकाच्या खांद्याला…

Read More

आज वेरूळ येथे लाखो भाविकांसह गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार:भारतातील सर्वात मोठी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मूर्तीची होणार पूजा‎

संतपरंपरेची पवित्र भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे. ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात महाराष्ट्रातून लाखो बाबाजी भक्त दाखल होणार आहेत. मिरवणूक आणि पाद्यपूजनाचा मुख्य कार्यक्रम : आश्रमाचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि…

Read More

सर्वेश कुशारेला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवगावच्या खेळाडूने अभिमानाने फडकावला भारताचा तिरंगा‎

निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला सर्वेश कुशारे यांचा प्रवास भारतीय क्रीडा इतिहासातील प्रेरणादायी पर्व ठरला आहे. सर्वेश यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सर्वेश यांच्या वडिलांचा कांदाशेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आधुनिक प्रशिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र,…

Read More

चालक बेशुद्ध, बस भरकटली; मावशींनी हँडब्रेक ओढून वाचवले 40विद्यार्थ्यांचे प्राण:धावत्या स्कूलबसच्या चालकाला अचानक भोवळ आल्याने नियंत्रण सुटले, रात्री उशिरा गुन्हा दाखल

शाळेची घंटा वाजली, सुटी झाली आणि नेहमीच्या लगबगीने ४० विद्यार्थी किलबिलाट करत बसमध्ये चढले. घरची ओढ लागलेली मुले आपापसात गप्पा मारत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, धावत्या बसमध्ये अचानक चालकाला भोवळ आली आणि ते स्टेअरिंगवरच बेशुद्ध पडले. क्षणात बस . मंगळवारी (२८ जुलै) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पिरॅमिड चौकात हा थरार रंगला….

Read More