शालार्थ आयडी' घोटाळा:भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना सोलापुरातून अटक, फार्महाऊसवर छापा मारून SITची मोठी कारवाई
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणारा बडा शिक्षण संस्थाचालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून शिताफीने ताब्यात घेतले. संजय गरुड हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील…