महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर:कोकण, घाटमाथा, विदर्भासह अनेक भागांना अलर्ट, धरणसाठ्यातही मोठी वाढ
राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन…