Headlines

विमा लॉबीने पर्जन्यमापकात बर्फाच्या बाटल्या ठेवून पाडला बनावट पाऊस:कारण- पीक विमा योजनेच्या मोठ्या लाभासाठी जालना जिल्ह्यात बनवाबनवीकसे केले




पीकविमा योजनेत भरपाई मिळवण्यासाठी हवामान आधारित ट्रिगर आवश्यक असते. हे ट्रिगर कृत्रिमरीत्या सक्रिय करण्याच्या उद्देशाने जालना 49 पैकी 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये छेडछाड केली. काही पर्जन्यमापकांमध्ये बर्फाने भरलेल्या बाटल्या ठेवल्या. फळपीक विमा योजनेच्या लाभासाठी कार्यरत असलेल्या लॉबीने हा प्रकार केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले. हवामान केंद्रांवर पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची नोंद होते. परंतु, पर्यन्यमापकात बर्फाच्या बाटल्या, पाणी टाकल्याने काही ठिकाणी पाऊस नसताना अतिवृष्टीची नोंद झाली. हवामान केंद्रांवरील सेन्सर उपग्रहाद्वारे कार्यरत असल्याने पाऊस व इतर घटकांतील विसंगतीने हा प्रकार उघड झाल्याचे स्कायमेटचे जिल्हा समन्वयक गणेश काटे म्हणाले. लवकरच उपाययोजना करू हवामान केंद्रांवरील सर्व सेन्सर उपग्रहाद्वारे कार्यरत असल्याने पर्जन्यमान व इतर हवामान घटकांतील विसंगतीमुळे हा प्रकार उघडकीस आला. लवकरच उपाययोजना करण्यात येतील. गणेश काटे, समन्वयक, स्कायमेट केंद्रांवर सीसीटीव्ही बसवू
यासंदर्भात संबंधित पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. हवामान केंद्रांभोवतीच्या संरक्षक जाळ्यांची उंची वाढवण्यासह सर्व केंद्रांवर टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. – आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी असा उघडकीस आला प्रकार
काही ठिकाणी पर्जन्यमापकात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली होती. त्याच वेळी तेथील तापमान, हवेचा दाब आणि आर्द्रता अशा हवामान घटकांमध्ये कोणताही नैसर्गिक बदल दिसून आला नाही. सर्व सेन्सर उपग्रहाद्वारे एकत्रित माहिती पाठवत असल्याने ही विसंगती तांत्रिक तपासणीत निदर्शनास आली. त्यामुळे पावसाची नोंद वाढवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हवामान केंद्रात छेडछाड केल्याने गोंदी येथे 6 जुलैला पाऊस नसताना 70.8 मिमी, भातखेडा येथे 7 जुलैला 75 मिमी पावसाची नोंद झाली. बदनापूर तालुक्यातील बामखेडा येथे पर्जन्यमापकात पाण्याच्या बाटल्या, धावडा आणि वाघ्रुळ जहागीर येथे उपकरणांची तोडफोड केली. पोलिसात तक्रार दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *