Headlines

संभाजीनगरातील ठाकरे स्मारकास 15 कोटी मंजूर:पालकमंत्री शिरसाट यांना दूर ठेवून उपमहापौर जंजाळ यांनी आणला निधी

सिडकोतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. स्मारकाची काही कामे अपुरी असल्यामुळे सुशोभीकरणासाठी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या निधीचा शासन निर्णयदेखील निघाला…

Read More

पुणे-अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात:भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. योगेश शिंदे (वय 35, रा. शिंदे वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) असे उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे अपघात आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला आहे. याबाबत योगेश शिंदे यांची पत्नी माया (वय 30) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

भगवंत दिसत नसला तरी प्रत्येक कणात विराजमान- साक्षी महाराज:खंडाळ्यातील संत गोरोबाकाका मंदिरात कीर्तन‎

भगवंत डोळ्यांनी दिसत नसला तरी तो प्रत्येक कणात विराजमान आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य साक्षी दीपक महाराज ढोकळे यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील संत गोरोबाकाका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी आयोजित कीर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या. कीर्तनाची सुरुवात अभंग, भारूड आणि विविध दृष्टांतांनी झाली. भक्तीचा महिमा सांगताना साक्षी महाराज म्हणाल्या, वारा दिसत नाही पण…

Read More

शिंदे गटात गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा:खासदार संजय जाधवांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार जाधव यांना काही काळापूर्वी ठाकरे गटातून बंड केले होते. म्हणून उद्धव ठाकरे यांनीच परभणीत जाऊन…

Read More

वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धन‎:स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम‎

येथील सरदवाडी रोडवरील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात नवसंजीवन वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नाशिक जिल्हा चिटणीस मीरा सानप यांच्या संकल्पनेतून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. . या अभियानास ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे व डॉ. दीपक श्रीमाली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित…

Read More

कळवणला आश्रमशाळांमध्ये 325 पदे रिक्त:विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, रिक्त पदे त्वरित न भरल्यास आंदोलन, परिवर्तन कामगार सेनेचा इशारा‎

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल ३२५ पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था विस्कळीत झाली असून विद्यार्थ . आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळाच शिक्षणाचा मुख्य आधार आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक विषयांचे नियमित अध्यापन होत नसून काही ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक…

Read More

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा…

Read More

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवणे महत्वाचे:अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांचे प्रतिपादन‎

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Read More

मीटरची सरासरी किंमत 20 हजार रुपये:10 ते 15 लाख शेतकऱ्यांना मीटरने पाणी; 2 हजार 250 काेटींचा बाेजा, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची शिफारस

धरण, नदी यासह अन्य जलाशयातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 10 टक्क्यापर्यंत वाढ करण्यापाठोपाठ आता या पाण्याचे मोजमाप मीटरद्वारे करण्याची शिफारस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केली आहे. आता त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जलसंपदा विभागावर आली आहे. मीटर बसवल्याने आर्थिक बोजा पडेल, असे कारण सांगून त्याला विरोध होऊ लागला आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्याला 10 ते…

Read More

कौंडण्यपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानला प्रथम क्रमांक:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार2026'' प्रदान‎

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. शतकानुशतकांची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारामध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थानला एक…

Read More