Headlines

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!:विखे पाटलांच्या बंगल्यावर ठिय्या; आश्वासने तातडीने पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा




मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांत ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग निवडला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसून सरकारकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. समाजाला दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत
याच पार्श्वभूमीवर रमेश केरे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलकांनी विखे पाटील यांना मागण्यांचे निवेदन देत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मराठा समाजाला दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलकांच्या मते, मराठा उपसमितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत ठोस कार्यवाही दिसून येत नसल्याने समाजात नाराजी वाढत आहे. त्यामुळेच सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. बातमी अपडेट होत आहे.. साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!: अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील मोटारसायकलस्वाराचाही जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *