Headlines

दिल्लीत जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘परवाच तर जाऊन आलो:केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार, या राजकीय चर्चेला खुद्द फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. मुख्यमंत्र्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन, आलो, मिश्कील टि . फडणवीस यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल आणि त्यांच्या जागी बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावा ठाकरे गटाचे…

Read More

"समृद्धी’वर भरधाव ट्रकने जीवरक्षकालाच चिरडले:अपघात करून पळालेला ट्रक 12 तासांत जप्त

समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात घडला. महामार्गावर नादुरुस्त झालेल्या एका कारमधील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी बॅरिकेडिंग करणाऱ्या महामार्ग आपत्कालीन मदत वाहनाचे (आरपीओ) चालक मुन्नालाल प्रजापती (३४) यांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची चाके प्रजापती यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने पायांच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या, तर डोके…

Read More

रेल्वेत कामाच्या ताणामुळे होटगीस्टेशन मास्तर टाॅवरवर चढला:आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तीन तास आंदोलनानंतर खाली उतरले

कामाची जबाबदारी नसताना काम लावणे, रेल्वे डीआरएम कार्यालयात बोलावून दिवसभर बसवून ठेवणे, कर्तव्याचा भाग नसताना सुरक्षा कवच टॉवरवर चढवून काम करायला लावल्याने होटगी स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांनी शनिवारी सकाळी स्टेशन येथील सुरक्षा कवचच्या टॉवरवर १०० फूट वर चढून आंदोलन सुरू केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दोन ते तीन तास सुरू होतो. शेवटी…

Read More

मत्स्यविज्ञान महाविद्यालयाने महिलांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण:गोड्या पाण्यातील माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे धडे

मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांसाठी तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गोड्या पाण्यातील माशांपासून ‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि समारोपीय कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोर्शी तालुक्यातील स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांच्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यांना…

Read More

लाडकी-पिंपळखुटा-बोडना रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य:निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त, अपघातांची भीती

मोर्शी प्रतिनिधी: लाडकी, पिंपळखुटा आणि बोडना गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही, एका खासगी कंपनीने बांधलेल्या या रस्त्यावर माती आणि मुरमाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या तिन्ही गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या…

Read More

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार:युवक काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह, डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावतीत आंदोलन

अमरावती येथे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आज, शनिवारी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित अपहार झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिरात हे प्रतीकात्मक आंदोलन झाले. यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा निषेध केला. डॉ. देशमुख…

Read More

शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात:दोन दिवसांत 1 लाखांचा दंड वसूल, 'संभाजीनगर पॅटर्न'ची चर्चा

छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ‘विशेष संयुक्त पाहणी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी करत आहेत. हा अभिनव ‘छत्रपती संभाजीनगर पॅटर्न’ यशस्वी झाल्यास तो देशासाठी कचरा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. शहराच्या विविध भागांवर लक्ष ठेवण्यासाठी २९…

Read More

विद्यालयात रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थाध्यक्षांकडून शिवीगाळ:व्हिडीओ व्हायरल, संस्था म्हणाली – सेवकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली

सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात एक वर्षानंतर रूजू होण्यासाठी गेलेल्या सेवकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्याध्यापकाने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी सेवकाने शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारही केली आहे. तर दुसरीकडे संबंधित सेवकाने स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. या संदर्भात सेवक गणेश खाटेकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्र दिले आहे. सेनगाव तालु्क्यातील…

Read More

संभाजीनगर पाणी योजना:तांत्रिक दुरुस्त्यांमुळे वेळेवर पाणी नाही, जल अभ्यासक डॉ. दाते पाटील यांचे मराठवाडा पाणी परिषदेत मत

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक दुरुस्त्या दूर केल्याशिवाय नागरिकांना वेळेवर पाणी मिळणे शक्य नाही, असे मत जल अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केले. मराठवाडा पाणी परिषदेतर्फे ग्राम विकास भवन, एन-२ सिडको येथे आयोजित ‘जलमंथन’ उपक्रमात ते ‘छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना व सद्यस्थिती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष…

Read More

Chandrashekhar Bawankule Claims Devendra Fadnavis Maharashtra CM Till 2034

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि हीच राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवी . देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन केंद्रात अर्थमंत्री होणार, अशा राजकीय चर्चा अधूनमधून सातत्याने रंगत असतात. या पार्श्वभूमीवर बावनकुळे…

Read More