Headlines

अंगणवाडी सेविकांचे वैजापूरमध्ये आंदोलन:जळगाव येथील सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी‎

तालुक्यात एका गावातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व विनयभंग झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रवीण डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, बाळू काशिनाथ डोंगरे व रवींद्र डोंगरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी…

Read More

अंगणवाडीच्या कर्मचाऱ्याने नाही तर ‘आईनेच’ केली चिमुरडीला मारहाण:नवी मुंबईतील व्हायरल व्हिडिओचे पोलिसांच्या तपासात उघड झाले सत्य

नवी मुंबईतील एका सरकारी अंगणवाडीत लहान मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील मारहाण अंगणवाडी कर्मचाऱ्याने केल्याचा दावा केला जात होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात एक वेगळेच आणि धक्कादायक सत्य समोर आले आहे. या चिमुरडीला अंगणवाडी कर्मचाऱ्याने नाही, तर तिच्या सख्ख्या आईनेच मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. भविष्यात…

Read More

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता…

Read More

'प्रॉप कनेक्ट 2026' राष्ट्रीय परिषद पुण्यात:देशभरातील रियल्टर्स, विकसक सहभागी होणार; 'प्रॉप'चे आयोजन

पुण्यात ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या राष्ट्रीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट येथे होणार आहे. या एकदिवसीय परिषदेत देशभरातील ३८ शहरांमधील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून…

Read More

हिंदू शास्त्रांचे सार विवेक जागृती: अमी गणात्रा:अमी गणात्रांच्या ‘व्हाय आर वी धिस वे’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

लेखिका व संशोधक अमी गणात्रा यांच्या ‘व्हाय आर वी धिस वे: अ गाईड टू हिंदू शास्त्राज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. हिंदू शास्त्रांचा उद्देश केवळ परंपरांचे पालन करणे नसून, व्यक्तीमध्ये विवेकबुद्धी जागृत करणे हा आहे, असे…

Read More

बापावरचं कर्ज कसं फेडायचं?:शिक्षणाच्या आणि कर्जाच्या चिंतेतून 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, वसमत पोलिस ठाण्यात नोंद

वडिलांवर ग्रामीण बँकेचे असलेले कर्ज कसे फेडावे तसे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाच्या चिंतेतून 19 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा तालुक्यातील मरसुल येथील योगेश कदम (19) या तरुणाला इयत्ता बारावी मध्ये 51 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर…

Read More

केतन अग्रवाल प्रकरणानंतर विवाहपूर्व तपासणीची गरज अधोरेखित:अनेक कुटुंबे फसवणूक आणि संकटांपासून वाचू शकतात – डिटेक्टिव्ह प्रिया काकडे

केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर विवाहपूर्व पार्श्वभूमी पडताळणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी पत्रकार परिषदेत हे प्रतिपादन केले. त्यांनी विवाहपूर्व तपासणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक फसवणूक, आर्थिक गुन्हे, घटस्फोट आणि कौटुंबिक वादांसंदर्भातील अनुभव सांगितले. प्रिया काकडे यांच्या मते, लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असला तरी, आजही अनेक…

Read More

उदय सामंतांचे संजय पाटील यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण:म्हणाले- पाटील दिलदार मित्र, पण पत्रकारांवरील रागाचे कारण वेगळे

खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. सामंत यांनी संजय दीना पाटील यांची बाजू सावरून धरत, विरोधकांनाही टोला लगावला. ते म्हणाले, “संजय दीना पाटील यांची वागण्याची पद्धत आणि देहबोलीच तशी आहे. त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असून,…

Read More

'मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल':अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप; भाजपमध्ये मराठा-ब्राह्मण वाद?

‘सारथी’ संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील नाराजीनाट्य समोर आले आहे. पहिल्या रांगेत बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी थेट मंचावरून निघून गेल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर आमदार पवार यांनी…

Read More

मयंक लोहार हत्येवर अभिनेते स्वप्नील राजशेखर संतापले:म्हणाले- डब्यात 100 लोक होते, व्हिडिओ काढले पण कुणीच मदत केली नाही

मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, डब्यातील प्रवाशांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘शंभर प्रवासी होते, पण मदतीला कुणीच आलं नाही’ स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “रेल्वेच्या डब्यात किमान शंभर…

Read More