मोठा निर्णय:पंढरपूर कॉरिडॉरला हिरवा कंदील, 4000 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी; भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार
मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर प्रकल्पासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून भूसंपादनाची…