Headlines

साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात‎

साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या 'सीन रीक्रिएशन'साठी घटनास्थळी दाखल

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी ‘सीन रीक्रिएशन’ आयोजित केले आहे. केतनला कोणत्या…

Read More

मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला:शहरात सायंकाळी दीड तास पाऊस बरसला‎

अकोला शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. जोराच्या पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. पावसामुळे अकोला शहरातील वीज काही काळ गेली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. अकोला शहरात सायंकाळी पाचपासून साडेसहा वाजेपर्यंत सुमारे दीड तास पाऊस बरसला. त्यानंतर त्याने थोडी…

Read More

अंबाड्यातून 1.39 लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त:विक्रीसाठी आणल्याचे आले समोर, एकावर गुन्हा‎

शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची साठवणूक करून ती शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करणाऱ्या अंबाडा येथील एकावर कृषी विभाग आणि मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ८६ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, सुमारे १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई २६ जूनला सायंकाळी करण्यात आली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

Read More

महिलांच्या छळासंदर्भात प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करावा:आमदार सुलभा खोडके यांची अधिवेशनात मागणी‎

महिला अत्याचार व लैंगिक छळाच्या प्रकरणांतील तक्रारींचा राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित असलेला मोठा भार कमी करून पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार सुलभा संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. आमदार खोडके यांनी मांडलेल्या लक्षवेधीनुसार, १ एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या १६,६०८ तक्रारी दाखल…

Read More

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प . परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या…

Read More

टोमॅटो, लसणासह फळभाज्यांना महागाईची फोडणी‎:वादळी वाऱ्याचा तडाखा व भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात दरवाढ

अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झाला आहे. परिणामी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी आणि हायब्रीड लसणाचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळे कोलमडले असून, बाजारात फळभाज्यांची खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्वाधिक दरवाढ टोमॅटो आणि हायब्रीड…

Read More

सिया – केतनने गुगलवर शोधला 'डेथ पॉइंट':लोहगड किल्ल्यावर आधी केली रिहर्सल; पोलिसांच्या चौकशीसाठी उत्तरेही तयार केली होती

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांना कटाशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनुसार, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुगल मॅपवर लोहगड किल्ल्याच्या पायवाटा, धोकादायक ठिकाणे आणि दऱ्यांची माहिती गोळा केली. दोघांनी गुगलवर ‘डेथ पॉइंट’ आणि ‘विष देऊन कसे मारावे, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही’ असे प्रश्नही शोधले होते. दोघांनी आधीच हे देखील…

Read More

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर तो संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून, राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे…

Read More

कोट्यवधींचा खर्च पाण्यात:पहिल्याच पावसामध्ये गंगापूर ते कायगाव‎रस्ता चिखलमय; वाहनधारकांची गैरसोय‎

गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि शेजारील अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा गंगापूर ते कायगाव हा ८ किलोमीटरचा रस्ता पहिल्याच पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मुख्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य बनला आहे. यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत…

Read More