Headlines

सरकारचा आदिवासींसाठी मोठा निर्णय:5 प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये, 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस…

Read More

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय:यंदापासूनच प्रवेश सुरू; श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्लाय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यास…

Read More

'गिरा तो भी मेरी टांग उपर':गिरीश महाजन यांचा संजय राऊतांना खोचक टोला, विरोधकांवरही डागली टीकेची तोफ

भाजपचे संकटमोचक आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर, विशेषतः संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या परिश्रमाचा दाखला दिला. यावेळी महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, राऊतांची अवस्था ‘गिरा तो भी मेरी टांग उपर’ अशी…

Read More

नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका तरुणीने आधीच अनेक वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, आठ लग्नं करूनही ही फसवणूक सुरूच ठेवत नवव्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले आणि अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक…

Read More

दहशतवादाशी लढताना पोलिसांचे बलिदाने जास्त:तरीही आम्हीच उपेक्षित, टीकेचे धनी ठरतो पण देशासाठी प्राणही देतो!- आयजी सुनील फुलारी

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस दलाची व्यथा मांडली आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना देशातील पोलिस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, असे ते म्हणाले. तरीही पोलिस दल उपेक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 75 वर्षांतील आकडेवारीनुसार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांमध्ये सशस्त्र दलांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. असे असूनही,…

Read More

पुणे पेट्रोल पंपावर सायबर फसवणूक:व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा, कमिशनसाठी बँक खात्यांचा वापर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमिशनच्या आमिषाने सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्याची परवानगी दिल्याप्रकरणी पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ ५० रुपयांच्या कमिशनसाठी हे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. याप्रकरणी एका ४३ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंपाचा…

Read More

23 गावांच्या 'स्ट्रक्चरल प्लॅन'साठी इरादा जाहीर करा:नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पुणे महापालिकेला सूचना

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला 23 समाविष्ट गावांचा संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करण्यासाठी तातडीने इरादा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या गावांच्या नियोजनबद्ध आणि वेगवान विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 14 व्या वार्षिक सर्वसाधारण…

Read More

लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश; कॅबिनेटची 3 महत्त्वाच्या निर्णयांवर मोहोर

पुण्याच्या नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90 टक्के त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. त्यानंतर पुन्हा ते तोच गुन्हा करतात. त्यामुळे या आरोपींना पॅरोल देऊ…

Read More

२८ लाखांची लाच, महिला पोलिस अधिकारी निलंबित:पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश; पदोन्नतीही रद्द

२८ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार यांना पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. तोटेवार यांच्यावर एका जमिनीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. वैशाली तोटेवार यांची पदोन्नतीने मुंबई लोहमार्ग पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. बदलीनंतर त्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतून…

Read More

पुण्यात 37 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना 15 दिवस ते 1 महिना कोठडीत टाकणार!

पुणे शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मागील 10 वर्षांतील गुन्हेगारी नोंदी तपासल्यानंतर शहरात 37 असे सराईत गुन्हेगार आढळले आहेत, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या सर्व 37 गुन्हेगारांवर मंगळवारपासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त…

Read More