कन्नडला 3 हजार नागरिकांमागे 1 पोलिस:37 कर्मचाऱ्यांवर भार, शहरामध्ये सुरक्षेचा उडाला बोजवारा
कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून, नुकतीच पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारात झालेल्या एका खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत ठाण्यातील रिक्त पदांची संख्या पाहता, ३ हजार नागरिकांमागे १ पोलिस असून, ५२ पदे रिक्त असल्याने ३७ कर्मचाऱ्यांवर भार पडत…