Headlines

तरुणाची १५ लाखांची फसवणूक:हडपसर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल, तपास सुरू




पुण्यात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एक संदेश आला होता, ज्यात ऑनलाइन उत्पादनांच्या खरेदी-विक्रीतून चांगला परतावा मिळेल असे म्हटले होते. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठवली आणि त्यात त्याची माहिती भरण्यास सांगितले. गेल्या दीड महिन्यात तरुणाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात एकूण १५ लाख ३१ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतरही परतावा न मिळाल्याने तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. बस प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरी दरम्यान, आणखी एका घटनेत पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील ८० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबवली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या रविवारी (३ एप्रिल) सकाळी पिंपरीतील मोरवाडी ते पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी कटरचा वापर करून महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेली. बालाजीनगर येथे बसमधून उतरल्यावर त्यांना बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस कर्मचारी कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *