Headlines

भटके आणि विमुक्त समाजाच्या‎प्रगती शिवाय देश महासत्ता नाही‎:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत‎

इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची खंत भटके विमुक्त समाज राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेअंतर्गत राज्यातील भटके विमुक्त समाजातील शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकारासाठी घरगणना व जनगणना करणे ही काळाची गरज आहे, भटक्या, विमुक्त…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

‘मयू, हे मला मारत घेऊन चालले आहेत, मला वाचव’:वेरूळचे शिक्षक बोरसे यांची शेवटची ही आर्त हाक असल्याचा मुलीचा " दिव्य मराठी''कडे खुलासा‎

‘माझ्या वडिलांनी फक्त माणुसकीच्या नात्याने वाद काय सुरू आहे ते विचारले. पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विनंती केली. बस, याच गोष्टीमुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला. त्यांनी वडिलांना तेथेच कानशिलात लगावली. त्यानंतर गाडीत कोंबून मारत नेले. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणि आईलाही रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या…

Read More

वैजापूर तहसील, बोकुड जळगाव, चितेगाव येथे स्वच्छता अभियान:जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद‎

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (१३ जुन) जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी तर पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव, चितेगाव येथे ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसर चकाचक केला. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे…

Read More

लातूर–नांदेड महामार्गावर भीषण तिहेरी अपघात!:कंटेनर, कार आणि दुचाकीची धडक; बालकासह तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका लहान मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, वाहनांचा चक्काचूर झाला असून जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मिळालेल्या…

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका:पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले

एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी थेट पक्ष कार्यालयाचीच तोडफोड करून सर्व साहित्य पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, लातूरमध्ये…

Read More

शू रॅकमध्ये चावी ठेवणे पडले महागात:घरातून 1.41 लाखांचे दागिने चोरी, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घराबाहेर पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) चावी ठेवणे एका कुटुंबाला महागात पडले आहे. या चावीचा वापर करून चोरट्याने सदनिकेत प्रवेश करत कपाटातून एक लाख ४१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना लोणी काळभोर येथे घडली असून, लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका तरुणाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे….

Read More

सक्षम ताटे हत्या प्रकरण:आंचलने तीन महिन्यात सासरचे घर का सोडले? सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत धक्कादायक केला खुलासा

प्रेमासाठी कुटुंबियांविरुद्ध बंड पुकारत, प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेणाऱ्या नांदेडमधील आंचल मामिडवार हिच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. “आंचल बहाणा करून घर सोडून निघून गेली,” या सासूच्या आरोपांनंतर आंचलने स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत मौन सोडले आहे. “प्रियकर सक्षम ताटे याच्या लहान भावाने माझ्याशी अत्यंत गैरवर्तन केले; ही बाब घरात सांगूनही…

Read More

रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस:कर्जमाफीच्या अटींवर तोडगा निघणार? कृषिमंत्र्यांची घोषणा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित

पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही.. “माझे वडील, पत्नी आणि मुलं भावुक झाली…

Read More

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 57 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडून तपास सुरू

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सायबर चोरट्यांनी ५७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथे राहणारे तक्रारदार एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक…

Read More