राज्यात कुठे कडाक्याचे ऊन तर कुठे अवकाळीचा फटका:रायगडमध्ये वीज पडून बालकाचा मृत्यू; पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचे स्वरूप
राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत असून एका बाजूला तीव्र उष्णतेमुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसरीकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रज परिसरात नदीचे स्वरूप मिळाले आहे. या अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून बागांचे मोठे नुकसान झाले आहे; दरम्यान, रायगड…