अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण
गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी…