पुण्यात 'बर्गर किंग'वर एफडीएची धडक कारवाई:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न परवाना थेट रद्द, मुंबईनंतर आता पुण्यातही कारवाईचा बडगा
राज्यभर धडक कारवायांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आता पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कँप परिसरातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ‘बर्गर किंग’ आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने अचानक छापा टाकत या शाखेचा अन्न परवाना जागेवरच रद्द केला आहे. दररोज हजारो खवय्यांची मोठी गर्दी होणाऱ्या या…