Headlines

‘नशामुक्त' कावड पालखी उत्सवाचा शिवभक्तांचा संकल्प:ऐतिहासिक परंपरेची ‘गिनीज बुक''मध्ये नोंद करण्याची एसपींची इच्छा‎

जिल्ह्यातील ऐतिहासिक व वैभवशाली कावड पालखी उत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व कावड, पालखी व शिवभक्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा कावड उत्सव पूर्णपणे ‘नशामुक्त’ वातावरणात साजरा करण्याचा ऐतिहासिक व कौतुकास्पद…

Read More

सत्संग सोहळ्यास जाताना गाडी उलटली:जिवितहानी नाही; स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले‎

अकोला ते अकोट महामार्गावरील दहीहांडा फाटा ते गोपाळखेड बायपास मार्गावर सत्संग सोहळ्यासाठी जाणाऱ्या एका खासगी प्रवासी वाहनाला अपघात झाला. वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याखाली उतरून थेट शेतात उलटले. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अकोला येथे आयोजित सत्संग सोहळ्यासाठी हे वाहन चार ते पाच प्रवाशांना घेऊन…

Read More

10 हजारांहून अधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे 3 महिन्यांपासून रखडले:2016 च्या आधीचा जन्म, मृत्यू असलेल्यांना विलंब‎

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तेही २०१६ च्या आधीचा जन्म किंवा मृत्यू असलेल्यांचे दाखले मिळणे सध्या महाकठिण झाले आहे. हे दाखले मंजूर करण्याचे अधिकार (आयडी) केवळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मर्यादित आहेत. ते संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या अर्जांपैकी दिवसभरात फारतर ७० ते ८० अर्जांना मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे दिवसाला केवळ काही मोजकेच जन्म-मृत्यूचे दाखले निकाली निघत आहेत. त्यामुळे प्रलंबित दाखल्यांची…

Read More

4 महिन्यांत 8 रुपयांनी महागला सीएनजी; प्रथमच ओलांडली शंभरी:मदर स्टेशन जिल्ह्यातच असूनही प्रतिकिलो 103.78 रुपये दर, वाहनचालकांच्या खर्चात वाढ‎

मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांवर आर्थिक बोजा पडत आहे. शहर व जिल्ह्यात हजारो वाहने सीएनजीवर धावत असून, गेल्या चार महिन्यांत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो तब्बल आठ रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सीएनजीचे मदर स्टेशन सुरू होऊनही ही दरवाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये…

Read More

राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग:विदर्भासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD चा यलो अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी…

Read More

तनपुरे कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी 478 कोटींचा प्रस्ताव:अत्याधुनिक मशिनरी बसवून गाळप क्षमता वाढवण्याचा अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा निर्धार‎

एकेकाळी आशिया खंडात नावाजलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासनाने राज्य सरकारकडे ४७८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्र . १९५३ साली मिळालेले मूळ प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे गोळा करून ४७८ कोटींची प्रस्तावित निधीची फाईल राज्य सरकारकडे सादर केली आहे….

Read More

मुक्ताई ट्रेडिंग फसवणूकप्रकरणी ‎संशयितांची 12 लाख रक्कम फ्रीज‎:आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद‎

बागलाण तालुक्यातील बहुचर्चित ‘मुक्ताई ट्रेडिंग’ फसवणूक प्रकरणात २०० ते ३०० बाधित शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तात्पुरता विराम मिळाला आहे. कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सुरू आहे. पोलिस तपासात आतापर्यंत संशियातांच्या बँक खात्यांमधील १२…

Read More

औट्रम घाटाचे काम तातडीने पूर्ण करण्याची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी:खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची दिल्लीत गडकरींशी भेट‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रखडलेले रस्ते प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गांच्या निकृष्ट कामांचा प्रश्न आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारात पोहोचला आहे. जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती मिळण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा…

Read More

आपेगाव, हिरडपुरी बंधारे तुडुंब; 50 गावांचा पाणी प्रश्न मिटला:हजारो हेक्टर शेतीला मिळणार भक्कम आधार‎, जायकवाडी धरणातील विसर्गाचा फायदा

पैठण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि वरच्या धरणांमधून झालेली जोरदार आवक यामुळे जायकवाडी धरण सध्या ९३ टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्या सहा दिवसांत धरणाचे दरवाजे उघडून ५ टीएमसीहून अधिक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. या सोडलेल्या पाण्याचा थेट व मोठा फायदा पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी…

Read More

ऑरिकसाठी 3200 हेक्टर जमिनीच्या मोजणीला पुढील आठवड्यात प्रारंभ:6 गावांतील बाधित शेतकऱ्यांची संख्या 3 हजारांवर

ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नव्याने ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमिनीच्या मोजणीस पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक गावात संयुक्त मोजणीसाठी स्वतंत्र पथक तैनात असणार असून, एका महिन्यात मोजणी पूर्ण झाल्यावर जमिनीच्या दरनिश्चितीसाठी वाटाघाटी केल्या जातील. ऑरिकच्या विस्तारासाठी एमआयटीएल प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासनाने…

Read More