सावता महाराजांच्या भेटीसाठी ‘विठ्ठला’चे अरणगावला प्रस्थान:विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गायन
संत सावता महाराजांचा प्रसिद्ध अभंग “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी’ या चा जयघोष करून आणि टाळ-मृदंगाच्या तालावर पांडुरंगाच्या पालखीचे संत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्यासाठी अरण (ता. माढा) कडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. पंढरपूर येथील काशी कापडी मठातून निघालेला हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गाऊन अरणच्या दिशेने…