बावनकुळेंना समज द्यावी, सरकारही पाडायला कमी करणार नाही- जरांगे:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा
मराठा आरक्षण आंदोलक संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य इशारा बैठकीला सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेसाठी सहा तासांहून अधिक उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासह समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या…