Headlines

दुचाकीला पिकअपची धडक; धोंडे‎जेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार‎:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात‎

सेनगाव शहराजवळ भरधाव‎पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने‎दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना‎शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या‎सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक‎सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण‎येथील रहिवासी होते. दोघे शिक्षक‎धोंडे जेवणासाठी रिसोडला गेले‎होते, परत येताना अपघात झाला.‎ वरूड चक्रपाण येथील शिक्षक‎संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे‎शनिवारी जनगणनेचे कर्तव्य पार‎पाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडे‎भेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी‎पाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतर‎दुचाकीने परत…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आधी ट्रॅक्टर ड्रायव्हर, आता रेशीम शेतीवर वार्षिक 25 लाख कमाई; अकोल्यातील शेतकऱ्याची रेशीम कोष अन् तुती रोपांची विक्री

पारंपरिक आणि कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीला फाटा देऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली, तर शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता करोडोंची उलाढाल करणारा उद्योग बनू शकते, हे अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील प्रगतीशील शेतकरी पांडुरंग गिऱ्हे यांनी सिद्ध करून दाखवले. एकेकाळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवणारे पांडुरंग आज रेशीम कोष व तुती रोपांच्या विक्रीतून…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच…

Read More

प्रियकराकडून तरुणीची 18 लाखांची फसवणूक:पैसे परत मागितल्यावर समाज माध्यमांवर फोटो व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

पुण्यात एका प्रियकराने तरुणीची १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसायासाठी कर्ज काढायला लावून प्रियकराने ही फसवणूक केली. तरुणीने पैसे परत मागितल्यावर त्याने तिचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात एका तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. रोहित अतुल पाटील…

Read More

राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षाच:1 जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

राज्यातील कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामानात मोठे बदल…

Read More

लाडकी बहीण योजनेला कात्री:80 लाख महिला बाद झाल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात

राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या एका महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून बाद…

Read More

हाय प्रोफाइल केसेस हातळणाऱ्या ED अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती!:नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह नवाब मलिक अन् संजय राऊतांच्या केसचाही केला होता तपास

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या सिलीगुडी येथे कार्यरत असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी यापूर्वी सुमारे 11 वर्षे मुंबईत सहसंचालक म्हणून काम पाहिले होते. मुंबईतील या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि पंजाब नॅशनल…

Read More

नागपूरच्या भांडेवाडीत दररोज 28 टन बायोगॅस निर्मिती:मनपाला वर्षाला 15 लाखांची रॉयल्टी, कचरामुक्तीचा 'नागपूर पॅटर्न'

नागपूर महानगरपालिकेने शहरातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भांडेवाडी डम्पिंग ग्राऊंडवर देशातील पहिला आणि आशियातील सर्वात मोठा ‘म्युनिसिपल सॉलिड वेस्ट-टू-कॉम्प्रेस्ड बायो गॅस’ प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाला ‘नागपूर पॅटर्न’ असे संबोधले जात असून, त्याची अंमलबजावणी आता देशातील इतर 11 मोठ्या शहरांमध्येही केली जाणार आहे. यामुळे नागपूरकरांना गॅस सिलिंडरच्या समस्येतून दिलासा…

Read More

राऊतांना अभिषेक बॅनर्जींचा पुळका..:..मग बंगालमधील हिंदू आणि कार्यकर्त्यांच्या हत्येवेळी गप्प का होता? नवनाथ बन यांचा सवाल

जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका येत आहे. पण याच बंगालमध्ये भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची, संघाच्या स्वयंसेवकांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा संजय राऊत गप्प बसले होते. ममता बॅनर्जी यांचे सरकार होते तेव्हा हिंदूना जगणं मुश्कील झाले होते, हिंदू माता-बहिणींवर जेव्हा अत्याचार झाले त्यावेळी राऊत काहीच बोलले नाही, असे भाजप…

Read More