दुधड शिवारात शेवगा येथील 17वर्षीय विद्यार्थ्याचा पोटावर वार करून खून:मित्राच्या बहिणीला का छेडतोस वादाचे पर्यवसान हत्येत
“तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येत झाले. अनिकेत अरुण राठोड ( १७, रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) या विद्यार्थ्याची धारदार चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (२९ मे) सायंकाळी दुधड-लाडसावंगी मार्गावरील दुधड शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली…