Headlines

शिंदेफळच्या भाग्यश्री बखळे हिची मुंबई पोलिस दलात निवड:ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती‎




शिंदेफळ येथील भाग्यश्री पंढरीनाथ बखळे हिची अवघ्या १९ व्या वर्षी मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. गावकऱ्यांच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शिंदेफळ येथील पंढरीनाथ बाजीराव बखळे यांची कन्या भाग्यश्री ही गावातून पोलिस दलात निवड झालेली पहिली महिला ठरली आहे. तिच्या या यशामुळे गावातील तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. यशाच्या पार्श्वभूमीवर श्री चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर परिसरात तिचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सरपंच रेखाताई अनिल अक्कलकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भाग्यश्रीचा सन्मान करण्यात आला. तसेच तिचे आई-वडील, आजी-आजोबा व परिवारातील सदस्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अनिल अक्कलकर, उपसरपंच विशाल काथार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बखळे, शालीक वाघमोडे, सुदाम गोमलाडू, गोरख अक्कलकर, रोहिदास दुतोंडे, रोहिदास सपकाळ, रामेश्वर कावले, चेअरमन राम बखळे, रानुबा शिंदे, विठ्ठल खांदवे, बाजीराव बखळे, सागर पंडित, विठ्ठल अक्कलकर, पद्माकर लाले, कैलास करडेल, पुंडलिक बखळे, संभाजी बखळे, सुनील बखळे, नारायण करडेल, गजानन पंडित, नारायण अक्कलकर, लीला वाघ, लक्ष्मी दुतोंडे, सविता दुतोंडे, चंद्रकला अक्कलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलिस पाटील संदीप ढंगारे यांनी तर आभार सागर पंडित यांनी मानले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाले कार्यक्रमात प्रा. दादासाहेब इंगळे, हावळे, मडावी, सागर पवार, बायर कंपनीचे शिंदे, अनुष्का पाटील, संतोष दाभाडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भाग्यश्रीच्या जिद्द, मेहनत व चिकाटीचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना भाग्यश्री हिने आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख केला. आई-वडील, परिवार व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले. मुलींनी शिक्षण घेऊन जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे आवाहन तिने गावातील तरुणी व युवकांना केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *