Headlines

‘सीयूईटी’ 2 तास उशिरा सुरू; 3,765 जण राहिले वंचित:एनटीएच्या आणखी एका परीक्षेत गोंधळ; एनटीएकडून माफी, परीक्षा हुकली त्यांना पुन्हा संधी


  • Marathi News
  • National
  • ‘CUET’ Started 2 Hours Late; 3,765 People Were Left Deprived, Confusion In Another NTA Exam; NTA Apologizes, Those Who Missed The Exam Get Another Chance

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रवेश परीक्षा सीयूईटी-यूजीची पहिली शिफ्ट शनिवारी अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक समस्येमुळे वेळेवर सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. एनटीएने सायंकाळी म्हटले की, तांत्रिक सेवा देणारी कंपनी टीसीएस आयनकडून उद्भवलेल्या समस्येमुळे काही केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यास विलंब झाला.

सुमारे ९५% विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा सुरू झाल्यानंतर पेपर पूर्ण केला. मात्र, ३,७६५ उमेदवारांनी बायोमेट्रिक नोंदणी केल्यानंतरही परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्र सोडले. त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. टीसीएस आयनकडून या गोंधळाबाबत तातडीने अहवाल मागवला आहे. दरम्यान, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून प्रभावित केंद्रांवर पूर्ण अतिरिक्त वेळ देण्यात आला, असे एनटीएने सांगितले.

ओएसएम निविदेवर विद्यार्थ्याचे प्रश्न : अटी बदलल्या, कंपनीला फायदा?

सीबीएसईच्या २०२५-२६ बॅचमधील विद्यार्थी सार्थक सिद्धांत यांनी ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रकल्पाच्या निविदा कागदपत्रांचे विश्लेषण करून दावा केला की, विविध टप्प्यांत पात्रता व तांत्रिक अटींमध्ये असे बदल केले. त्यामुळे कोएम्प्ट एडुटेकसाठी निविदा प्रक्रिया सुलभ झाली. विद्यार्थ्याने तीन निविदा आवृत्त्यांची तुलना करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली. त्याने पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत–

  • पूर्वी काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांना अपात्र ठरवण्याची अट होती. नंतर ती बदलून केवळ ‘सध्या काळ्या यादीत असलेल्या’ कंपन्यांपुरती मर्यादित झाली.
  • सॉफ्टवेअर गुणवत्तेसाठी सीएमएमआय लेव्हल-५ची अनिवार्यता कमी करून लेव्हल-३ केली. मोठ्या परीक्षा प्रकल्पांच्या अनुभवासंबंधी निकषांतही बदल केले.
  • कंपनीचे स्वतःचे डेटा सेंटर व आपत्कालीन पुनर्प्राप्ती केंद्र यासंबंधीच्या अटी सुलभ करण्यात आल्या.

हीच पिढी हिशेब मागेल : राहुल

नीट, सीबीएसई, एसएससी आणि आता सीयूईटी. चार परीक्षा, एक कोटी मुले आणि एकही परीक्षा प्रामाणिकपणे पार पडलेली नाही. या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे, तीच तुमचा हिशेब करेल. — राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *