Headlines

अमरावतीमध्ये प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात 100% समुपदेशनाने प्रक्रिया पूर्ण

अमरावती: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ऑनलाईन समुपदेशनाने करण्यात आल्या. हा अभिनव प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आला असून, यामुळे बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झाली. या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व ४१ कर्मचाऱ्यांची बदली झाली. तसेच, मंडळ अधिकारी संवर्गातील ५ पात्र कर्मचाऱ्यांची, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील ८२…

Read More

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे व्हावे:महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांचे विदर्भ साहित्य संघाला निवेदन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर शहरात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी, ज्येष्ठ साहित्यिक…

Read More

पुण्यातील विषारी दारूकांड:युवक काँग्रेसचे उत्पादन शुल्क विभागासमोर तीव्र आंदोलन, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. दोषींवर कठोर कारवाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रभारी गणेश उबाळे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह भूषण रानभरे,…

Read More

अवैध दारूवरील कारवाईसह व्यसनमुक्ती आवश्यक:डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट; कठोर कारवाईची मागणी

हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. केवळ दारूबंदी नव्हे, तर या प्रकरणी व्यसनमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलणे अधिक गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्यात. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या पीडित…

Read More

Buldhana Father, Brother Confess Murder; Girl Returns Alive

बाप व भावाने हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृत मानलेली तरुणी अचानक जिवंत घरी परतल्याची विचित्र घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या वडील व भावाने हत्येची कबुली क . जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. त्याच…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:धनंजय देशमुख यांच्या साडूला सख्ख्या भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना साक्ष मागे घेण्यासाठी चक्क त्यांच्या सख्ख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली…

Read More

विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच:जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील, कोकणात आमदार दळवींच्या मुलीने भरला अर्ज

विधान परिषदेच्या 17जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात तातडीने मुंबईला दाखल झाले. कोकणातील एकमेव जागेवरूनही शिवसेनेतच संघर्ष पेटला आहे. येथे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते आपापल्या मुलांसाठी तिकीट…

Read More

AI वापर काळाची गरज:प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक – जनरल उपेंद्र दिवेदी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर ही बदलत्या काळाची गरज आहे. जगात युद्धाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून उपलब्ध साधनसामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास उपयोग होतो. तसेच अल्पावधीत निर्णय घेणे देखील सुलभ झाले आहे.प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याची क्षमता विकसित करता आली पाहिजे. लढाईच्या मैदानात आता ड्रोन संख्या अधिक असणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परिणामी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर…

Read More

खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे

परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनएल 01 बी 1374 या क्रमांकाची खासगी बस शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास परभणीहून पुण्याच्या दिशेने जात होती. या बसने…

Read More

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामागे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित…

Read More