Headlines

जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला मागितली 1 लाखांची लाच:ग्राम महसूल अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जमीन सपाटीकरण आणि विहीर खोदकामाच्या परवानगीसाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनची…

Read More

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने 16 जणांचा मृत्यू:9 पोलिस, 13 उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊले उचलत 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ…

Read More

एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची संवेदनशीलता चर्चेत:हरवलेलं सर्वस्व परत मिळालं; जमीन परत मिळताच शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू

राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थासाठी निष्ठा बदलण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शिवसैनिकाची कहाणी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी आणि निवडणुकीसाठी स्वतःची 22 गुंठे शेतजमीन विकूनही पक्षाची साथ न सोडणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. या दोघांनी पुढाकार घेत संबंधित कार्यकर्त्याची…

Read More

भूसंपादनाचा मोबदला मिळेना; शिंगवे तुकाईचे शेतकरी बसले उपोषणाला:एकरी 50 लाखांची भरपाई आणि नोकरीसाठी शेतकरी आक्रमक‎

सोनई2 तासांपूर्वी कॉपी लिंक सोनई शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी देऊनही हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. पांढरी पूल येथील एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जमिनींचा योग्य मोब Source link

Read More

भाऊ अन् भाच्यांच्या त्रासाला बहीण कंटाळली!:हिंगोली तालुक्यात वृद्ध महिलेने शेतात संपवले जीवन, चाैंघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जेसीबीच्या पैशाच्या कारणावरून सख्खा भाऊ व भाच्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ता. 30 हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्रस कऱ्हाळे येथील जगन भिसे व त्याच्या मामाचा मुलगा वैजनाथ कऱ्हाळे या दोघांनी मिळून…

Read More

लाईटस् बंद, डोळ्यांसमोर स्फोट अन् मृत्यूची भीती:राहुरीच्या तेजस्विनीने सांगितला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तो थरार‎

जहाज युद्धक्षेत्रात अडकल्यानंतरचे ते तीन महिने एखाद्या भीषण स्वप्नासारखे होते. होर्मुझच्या समुद्रधुनीत सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका होता. इराणी सैन्याच्या रडारवर येऊ नये म्हणून आम्ही जहाजावरील सर्व लाईट्स आणि टँकर्स बंद करून अंधारात जीव मुठीत धरून बसायचो. डोळ्यांसमोर क्षेपणास्त्रांचे स्फोट होताना दिसत होते. मनात मृत्यूची भीती होती, पण स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही, असे…

Read More

शिवरायांचा इतिहास आता नव्या रूपात:विराग वानखडे साकारणार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य‎

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर येथील विश्वविक्रमी व्यक्तिमत्त्व विराग वानखडे हे महानाट्य साकारणार असून त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने पुढाकार घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता व चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ८० कलाकारांना घेऊन त्यांनी महानाट्य उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या स्तुत्य…

Read More

दरवाढीचा निषेध:इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंपावर आंदोलन, ‘मेलाेडी’च्या घोषणा देत सरकारवर टीका

पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारत शुक्रवारी थेट पेट्रोल पंपावर आंदोलन केले. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे म्हणत काँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. आंदोलन वाजीफदार पेट्रोल पंपासमोर करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका…

Read More

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:18 बळी नंतर CIDची एंट्री; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात 12 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागात 6 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय अनेक नागरिकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून…

Read More

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎

मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील…

Read More