Headlines

इंधनाअभावी शेतकऱ्यांची कामे थांबू नयेत:गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी इंधनाची स्वतंत्र व्यवस्था करा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

खरीप हंगामाची कामे आणि पेरणीची पूर्वतयारी ऐन रंगात आली असतानाच, राज्यातील शेतकरी बांधव डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीवर काँग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले आहे. अमित देशमुख यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र…

Read More

क्या रे जॉनी, म्हणत टपली मारली अन् तरुणाचा जीव गेला:नागपुरात क्षुल्लक कारणातून खून; किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने भीषण वळण घेत एका तरुणाचा जीव गेला आहे. कावरापेठ परिसरात भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर उमरेड शहरात एकच खळबळ उडाली असून…

Read More

सावरकर बदनामी प्रकरण:"त्या" बड्या सर्च इंजिन अन् नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढा, सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर न केल्याने एका समाज माध्यम व सर्च इंजिन तसेच एका नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढण्यात यावे, असा अर्ज सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी…

Read More

चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा एल्गार!:शेतकरी मरतोय अन् सत्ताधारी जागावाटपात व्यस्त!- रोहित पवार, सरकारने कांदा खरेदीची पावती दाखवावी- अंबादास दानवे

चांदवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती मोर्चा काढला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करावी आणि विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या आंदोलनावेळी बोलताना उबाठाचे अंबादास दानवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला…

Read More

सेनगावमध्ये भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास:पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

सेनगाव शहरात सोमवारी रात्री साडेसात वाजता बसस्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती व्यंकटेश खुनेर (वय 30, रा. गंगाखेड) या गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या माहेरी सेनगाव येथे आल्या आहे. सोमवारी रात्री 7:30 वाजेच्या…

Read More

अधिक मासात कथा श्रवण केल्यामुळे जीवन सार्थक होते- मुकुंद जाटदेवळेकर:पैठण येथे शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथेला उत्साहात सुरूवात

तीर्थक्षेत्र पैठणमध्ये अधिक मासानिमित्त अनेक ठिकाणी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. माहेश्वरी भक्तनिवास येथे (२४ मे रविवार ते ३१ मे रविवार) या काळात श्रीमद् भागवत कथा होणार आहे. कथा मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज, पाथर्डी, गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. कथेनिमित्त (२४ मे) रोजी बालाजी मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. राजस्थान युवक मंडळाचे…

Read More

राहुरी-मांजरी रस्ता डोकेदुखी:तीन वर्षांपासून ग्रामस्थ धुळीच्या साम्राज्यात, कामाची चौकशी‎करण्याची मागणी‎

राहुरी तालुक्यातील पूर्वभागासाठी महत्त्वाचा आणि वरदान ठरलेल्या राहुरी-मांजरी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम अद्यापपर्यंत अपूर्ण असल्याने परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. रस्त्यावर सध्या केवळ धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आता…

Read More

एकनाथ शिंदेंना मनवण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचाली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागांच्या वाटपावरून जोरदार चर्चा रंगली आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार असून 2 जून…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीत हालचाली वेगाने सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राज्यातील बदलत्या…

Read More