Headlines

मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत

‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रा.कुलकर्णी व प्रा. मोटेगावकर यांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे…

Read More

अर्थखाते मिळत नसल्याने सुनेत्रा पवार नाराज:राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली खंत; मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेलांची गैरहजरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी 13 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला असला तरी, महायुती सरकारमध्ये आता राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादीला दिले…

Read More

पुणे विधान परिषद जागा भाजपनेच लढवावी:जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात…

Read More

वरुडमध्ये प्रशासकीय दिरंगाई; हजारो लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित.:मुदतवाढीसाठी आमदार यावलकरांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची घेतली भेट.

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन धान्य वाटपासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची…

Read More

अमरावती फिशरीज हब प्रकल्पाचा आढावा:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मत्स्य विभाग आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण…

Read More

जैन साध्वींच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी:अमरावतीतील जैन समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या एका रस्ता अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अमरावतीतील जैन समाजाने मंगळवारी, २६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या २० मे रोजी रीवा येथे हा भीषण अपघात घडला होता. यामध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका…

Read More

दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे जंगी स्वागत:ग्रामस्थांकडून दोन किलोमीटरपर्यंत पुष्पवृष्टी; बुद्धमय वातावरण

अमरावती जिल्ह्यातील दाभा येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत श्रामणेरांचा सत्कार केला. यावेळी श्रामणेर संघाला भोजनदानही देण्यात आले. या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गाव बुद्धमय वातावरणाने भारले होते. ‘सबका मंगल हो’, ‘बुद्धं शरणं गच्छामि’ आणि ‘जय भीम’ च्या घोषणांनी…

Read More

कारखान्यांमध्ये हात गमावलेल्या कामगारांसाठी मोठा निर्णय:हात प्रत्यारोपणासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे कामगार मंत्र्यांचे निर्देश

राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात पुन्हा प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी दिले. या संदर्भातील प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये उपक्रम राबविण्यात यावा, अशा…

Read More

रायगड विकास प्राधिकरण बरखास्तीची मागणी, संवर्धनात भ्रष्टाचार:9 वर्षांत 603 कोटी मंजूर; तरीही गडावर निकृष्ट कामे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षांत सुमारे ६०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही गडावर समाधानकारक काम झालेले नाही. शिवरायांच्या सैन्यातील पायदळप्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि ॲड. अर्चना मारणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

Read More

सातारा क्राइम डायरी:मालगावात किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांत हाणामारी; एकावर गुन्हा

सातारा तालुक्यातील मालगाव येथे शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण काशीद हे गावातील रस्त्याने जात असताना समीर पटेल याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. “टक लावून का पाहतोस?” या कारणावरून सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत…

Read More