अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात भीषण स्फोट; ट्रेनिंगदरम्यान हँडग्रेनेड फुटून चार जखमी:2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलिस मुख्यालयात एकच खळबळ उडाली….