Headlines

24 वर्षीय युवकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू:शेतातील वीज दुरुस्त करताना घडली घटना

चांदूर रेल्वे येथील सावंगी संगम परिसरात शेतातील वीजपुरवठा दुरुस्त करत असताना वीजेचा धक्का लागून २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकुश श्रावणजी नेवारे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करत असे. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून,…

Read More

अंजनगावात युवा शेतकऱ्याचा उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:दर्शन बऱ्हाणपुरे यांनी 2 एकरात 10 क्विंटल उत्पादन घेतले

अंजनगाव सुर्जी येथील युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी उन्हाळी मुगाची यशस्वी लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या २ एकर शेतीत तब्बल १० क्विंटल मुगाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, योग्य…

Read More

मोफत महाआरोग्य शिबिरात 18,631 जणांची तपासणी:जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत एकदिवसीय शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात १८ हजार ६३१ जणांची तपासणी व उपचार करण्यात आले. ‘जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत’ हे एकदिवसीय शिबिर पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १३७ प्रकारच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. रुग्णांना साहित्य व औषधे देखील वाटप करण्यात…

Read More

डॉ. पुष्पा लिमये यांच्या 'विविधा' पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

ज्येष्ठ शिक्षिका डॉ. पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. प्रख्यात लेखिका व विचारवंत डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते हे प्रकाशन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभेत पार पडले. यावेळी बोलताना डॉ. तोडमल यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी संदर्भ ग्रंथ मिळवून साहित्य निर्मिती करणे कठीण होते, तरीही अनेक लेखक व शिक्षिकांनी पुस्तके लिहिली. लेखक अक्षरांमधून वाचकांशी…

Read More

अमित ठाकरेंनी 'मातोश्री'पासून जरा सांभाळून राहावे:आदित्य निवडून आले, पण तुम्हाला पाडले; रामदास कदमांचा सावधगिरीचा सल्ला

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. अमितजींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावे, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी दिला. या राजकीय टोलेबाजीसोबतच, सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या…

Read More

राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार:"मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हणत केली खिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार एका वर्षात कोसळेल, या केलेल्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेसारखे केवळ एक दिवास्वप्न असून, त्यात वास्तवाचा लवलेशही नाही, असे फडणवीस रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी…

Read More

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकेत:मुंढवा पुलावरून उडी मारलेल्या तरुणीच्या प्रेमप्रकरणातून कारवाई

प्रेमप्रकरणातून एका उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणीने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. तरुणीचा भाऊ निखील चारुदत्त अष्टेकर (वय २२) याने खराडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे….

Read More

सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक

सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राजेंनी आपापल्या नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या कामकाजात यापुढे कोणताही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा…

Read More

एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जात असतात:विधान परिषदेच्या जागा वाटपावरही केले महत्त्वाचे विधान; पेट्रोलचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे. सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा…

Read More

राज्यात इंधन साठा मुबलक:अफवांवर विश्वास ठेवू नका, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी पंढरपूर येथून केले आहे. इंधनाची उगाचच साठवणूक करण्यापेक्षा गरजेनुसारच खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले….

Read More