Headlines

संसद रत्न 2026 पुरस्कार जाहीर:डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ यांच्यासह पाच जणांची निवड; जुलैमध्ये दिल्लीत होणार गौरव सोहळा

संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या एकूण १२ खासदारांपैकी ५ खासदार महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये लोकसभेतील…

Read More

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या…

Read More

संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा ४ जूनला समारोप:कुमारमंगलम बिर्ला मुख्य अतिथी, सरसंघचालक मोहन भागवत करणार उद्बोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ (द्वितीय वर्ष) चा समारोप समारंभ ४ जून रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि पद्मभूषण सन्मानित उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत समारंभाचे मुख्य उद्बोधन करतील. ‘कार्यकर्ता विकास वर्ग’…

Read More

Mahavitran Solar Scheme: 1kW Solar System for Rs 2500

भारत सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन व महावितरणच्या वतीने 1 किलोवॅटची छतावरील सोलर सिस्टीम योजना विशेष स्मार्ट योजना नावाने राबविण्यात येत आहे. ही योजना अनुदानावर आधरित असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले. . एक किलोवॅट छतावरील सौरऊर्जा प्रणालीस केंद्र व राज्य् शासनाकडून अनुदान उपलब्ध् असणार आहे. महावितरणकडुन राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सौर प्रणालीसाठी भारतीय…

Read More

हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी अधिकृत वाहने तसेच काही खाजगी संस्थांना डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. जिल्हा परिषद हिंगोलीचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 136 इन्क. बटालियन, टाटा…

Read More

ऐतिहासिक वारसा जपावा:पानगावच्या शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी द्यावा

तालुक्यातील पानगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अद्भूत वारसा आहे. या जलाशयाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी ॲड.प्रशांत शेटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ॲड. प्रशांत शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश वाघमारे यांनी पानगाव…

Read More

आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका:प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टाने दिली परवानगी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका बसला आहे. कोर्टाने त्यांच्या पोलिस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिवंगत गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले होते….

Read More

जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन‎

तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने…

Read More

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या…

Read More

रविवारी 31 मे रोजी दिसणार आता ‘ब्लू मून':एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना,खगोलप्रेमींना पर्वणी‎

निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ”शून्य सावली”चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता…

Read More