Headlines

रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब, वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता‎

ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदू‎असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादन‎क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्या‎शतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्र‎राहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‎‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून अधोरेखित झाली‎आहे. शिर्डी येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते‎ क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे‎उद्घाटन करण्यात आले. यामुळे देशाची लष्करी‎सज्जता कमालीची वाढली आहे.‎ या…

Read More

राजमाता जिजाऊ नदीघाटाचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवले जाणार:विकास परियोजनेंतर्गत गोदावरी नदीकाठाचे होणार सुशोभीकरण‎

पैठण शहरातील गोदावरी नदीकाठाचा विकास साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजना’ अंतर्गत घाट बांधकामाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई येत्या सोमवा . राजमाता जिजाऊ घाटास मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली….

Read More

पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना…

Read More

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

‘पैशांची मनीषा’ हेच पेपर फुटीचे कारण- सीबीआय:पुण्यातील फिजिक्स पेपरसेटर मनीषा हवालदारची कबुली

नीट पेपरफुटीप्रकरणी अटकेतील पुण्यातील फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न फोडले. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने संभाव्य प्रश्नांच्या नोट्स जाळूनही टाकल्या, अशी कबुली तिने दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, सलग ९ दिवसांपासून लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने शनिवारी दुपारी प्रा. शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’च्या कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ वाजेनंतरही ठाण मांडून संगणकातील…

Read More

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत होते. या कारवाईत २१ लाख रोख, लॅपटॉप आणि डेटा असा एकूण ३५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स’च्या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून…

Read More

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त

राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. रेशन दुकानदार आणि काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांच्या पॉस मशीनवरील एप्रिल महिन्याचा डेटा…

Read More

'मिशन आयएएस' आदर्श पिढी घडवत आहे – विकास खारगे:अमरावतीच्या संस्कार शिबिराच्या समारोपात कौतुक

‘मिशन आयएएस’ संस्था उद्याची आदर्श पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांना समाजाची सेवा करायची आहे आणि लोककल्याणकारी योजना राबवायच्या आहेत, त्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन देशाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि…

Read More

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती….

Read More

पुणे काँग्रेसला पूर्व-पश्चिम असे दोन शहराध्यक्ष:डॉ. विश्वजित कदम म्हणाले – 'संघटन सृजन'मुळे पक्षाला नवी उभारी मिळेल.

काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरासाठी प्रथमच पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी सांगितले की, हे नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील. पुणे शहर पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची, तर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर आणि माजी…

Read More