Headlines

रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब, वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता‎




ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदू‎असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादन‎क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्या‎शतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्र‎राहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‎‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून अधोरेखित झाली‎आहे. शिर्डी येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते‎ क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे‎उद्घाटन करण्यात आले. यामुळे देशाची लष्करी‎सज्जता कमालीची वाढली आहे.‎ या प्रकल्पाची क्षमता अत्यंत प्रभावी असून,‎उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी‎माहिती दिली. या प्रकल्पामुळे देशाला सलग ३६५ दिवस‎जरी युद्ध करावे लागले, तरी पुरेल इतका दारूगोळा‎आणि तोफगोळ्यांची निर्मिती करण्याची क्षमता आता ‎‎आपल्याकडे निर्माण झाली आहे. हा प्रकल्प देशाच्या ‎‎सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.‎ अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि नागपूर या चार‎शहरांचा समावेश असलेला ‘डिफेन्स कॉरिडोर’‎उभारण्याची मागणी राज्य सरकारने केली होती, ज्याला ‎‎संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा कॉरिडोर आता‎अंतिम टप्प्यात असून, यामध्ये ५ हजार कोटी रुपयांची‎मोठी गुंतवणूक होणार आहे. उद्योगांसाठी आवश्यक‎ती सर्व जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री‎उदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले‎आहे.‎ येथे दिले जाते रणगाड्यांचे प्रगत प्रशिक्षण‎ अहिल्यानगरमधील हे केंद्र आशियातील सर्वात जुन्या‎आणि मोठ्या रणगाडा प्रशिक्षण संस्थांपैकी एक‎आहे. येथे भारतीय लष्कराच्या चिलखती दलातील‎अधिकारी आणि जवानांना रणगाड्यांचे तांत्रिक‎ज्ञान, त्यांची देखभाल आणि रणधुमाळीतील‎रणनीती याचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते. भारतीय‎सैन्यातील अर्जुन, टी-७२ आणि टी-९० सारख्या‎अत्याधुनिक रणगाड्यांच्या प्रशिक्षणात या केंद्राची‎भूमिका अत्यंत महत्वाची मानला जाते.‎ संरक्षण सामर्थ्याचे आकर्षण; प्रदर्शन‎पाहण्यासाठी २० हजारांवर नागरिकांची गर्दी‎ शिर्डी येथे आयोजित संरक्षण उद्योग प्रदर्शनात क्षेपणास्त्रांपासुन ते आधुनिक‎संरक्षण उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. संरक्षण दलाशी संबंधित‎सुमारे १०० एमएसएमई उद्योगांचे स्टॉल या प्रदर्शनात होते. दिवसभर नागरिक,‎विद्यार्थी आणि युवक यांनी स्वदेशी शस्त्रनिर्मितीचा हा थरार पाहण्यासाठी गर्दी‎केली होती. सुमारे २० हजारांहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.‎ “भुईकोट”पासून सुरू‎
झाला लष्करी वारसा‎ अहिल्यानगर जिल्हा हा भारतीय‎सैन्याच्या ‘आर्मर्ड कॉर्पस्’चे‎(रणगाडा दल) माहेरघर मानला‎जातो. येथील ‘आर्मर्ड कोअर सेंटर‎अँड स्कूल’ हे रणगाडा हाताळणी‎आणि युद्धनितीचे आशियातील‎सर्वात जुने आणि मोठे मुख्य‎प्रशिक्षण केंद्र आहे.‎भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या‎मध्यवर्ती भागात असल्याने,‎पुण्यातील ‘सदर्न कमांड’शी‎जिल्ह्याचा समन्वय राखणे सोयीचे‎ठरते. ऐतिहासिक भुईकोट‎किल्ल्यापासून सुरू झालेला हा‎लष्करी वारसा आता अत्याधुनिक‎संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीने‎अधिक समृद्ध झाला आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *