'नीट' लीकचा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका नाही:नीटचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या 15% जागा वगळून प्रवेश प्रक्रिया राबवणार – सीईटी सेल
नीट पेपरफुटीमुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ही शक्यता फेटाळून लावली आहे. प्रस्तुत प्रवेश प्रक्रियेत सीईटी गुणांसह नीट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू केली जाईल, असे…