Headlines

काँग्रेस काळातही पेपर फुटले- डॉ. नीलम गोऱ्हे:परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, राजकारण टाळावे




आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत परीक्षांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले. परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गोऱ्हे म्हणाल्या की, दिल्लीत कोकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सरकारने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी, या मुद्द्यावर राजकारण केले जात आहे. काँग्रेसच्या काळातही अनेकदा पेपर फुटले होते, असे त्यांनी आठवण करून दिली. परीक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार योग्य तो न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी शेतकरी महिलांच्या हक्कांबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीचा उल्लेख केला. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडण्यात आले असून, त्यात शेतकरी महिलांची व्याख्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या केवळ ११ टक्के शेतकरी महिलांच्या नावावर जमीन आहे. चार दशकांच्या संघर्षानंतर शेतकरी महिलांना त्यांचा हक्क मिळाला आहे. बचत गटातील महिलांना शेती करण्यासाठी नाममात्र दरात शेतजमीन कसण्यासाठी मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डान्सबार विधेयकामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्सबारवर नियंत्रण येईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले. पंचतारांकित हॉटेल्समध्ये रात्रभर चालणाऱ्या पार्ट्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा गैरवापर उघडकीस आला आहे. गुरांच्या तपासणीसाठी वापरली जाणारी ही मशीन मानवी तपासणीसाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली असून, याबाबत माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पीसीएनडीटी कायद्यानुसार पोलीस आणि सिव्हिल सर्जन यांनी समन्वय साधून कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी आरएमसी प्लांट जबाबदार असून, पुणे महानगरपालिकाही तितकीच जबाबदार आहे. मात्र, मनपाकडून कोणत्याही प्लांटवर कारवाई होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पंढरपूर कॉरिडॉरच्या नियोजनाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी वाराणसीच्या धर्तीवर हा कॉरिडॉर विकसित केला जात असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे काही जणांचे विस्थापन होणार असले तरी, स्थानिक नागरिकांना याबाबतचा आराखडा समजावून सांगणे आवश्यक आहे. नागरिकांच्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत. वारकऱ्यांचे विस्थापन केले जात नसून, त्यांच्यासाठी लवकरच मोठे भक्तनिवास बांधले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *