Headlines

पुणे भाजपद्वारे रक्तदान महायज्ञ; 1 लाख बाटल्यांचे उद्दिष्ट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन




पुणे शहर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १ लाख रक्ताच्या बाटल्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त २६ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही माहिती दिली. शहराच्या विविध भागांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. संकलित केलेले सर्व रक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध रक्तपेढ्यांना दिले जाणार आहे. महाराष्ट्रात रक्ताची मोठी गरज असल्याने, या उपक्रमातून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच, हिंदुगर्जना फाउंडेशन आणि अभय भूतडा फाउंडेशन यांच्या वतीने सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एस. पी. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन धीरज घाटे यांनी केले आहे. नामाचा गजर होणार २३ जुलै रोजी कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘नामाचा गजर’ हा संत रचनांचा सांगीतिक कार्यक्रम गुरुवार, २३ जुलै रोजी सायं ५ वाजता मयूर कॉलोनी, कोथरूड येथील एम ई एस, बाल शिक्षण रंग मंदिर सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष असून यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सुधाकर चव्हाण आणि शाश्वती चव्हाण यांचे गायनाने होईल. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र ज्येष्ठ गायक श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांचे गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच ज्येष्ठ गायक पं. कल्याण गायकवाड आणि झी मराठी ‘सा रे ग म प’ स्पर्धेची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड–पिसे यांचेही सादरीकरण होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *