![]()
पुण्यातील कात्रज परिसरात बहिणीशी झालेल्या वादातून टोळक्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव, पुणे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण आणि गणेश माळवे हे मित्र आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी माळवे याचा एका आरोपीच्या बहिणीशी वाद झाला होता. या वादामुळे एका आरोपीने गणेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी (२० जुलै) रात्री दहाच्या सुमारास माळवे आणि चव्हाण हे कात्रज कट्टा परिसरातील एका दुकानात दुरुस्तीसाठी दिलेला मोबाइल घेण्यासाठी गेले होते. त्यांनी दुरुस्त केलेला मोबाइल दुकानातून घेतला, त्याच वेळी दुचाकीवरून आरोपी तिथे आले. आरोपींकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींना पाहताच माळवे तेथून पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माळवेला पाहून त्याचा मित्र चव्हाण याने तात्काळ माळवेच्या भावाला घटनेची माहिती दिली. माळवेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अल्पवयीनाशी अश्लील कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा अल्पवयीनाशी अनैसर्गिक कृत्य करुन त्याची मोबाइलवर चित्रफीत तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रादार महिलेचा बारा वर्षीय मुलगा आरोपींबरोबर क्रिकेट खेळत होता. आरोपींनी मुलाला धमकावून एका हॉलमध्ये नेले. तेथे अल्पवयीनाशी अनैसगिक कृत्य केले. आरोपींनी मोबाइलर चित्रीकरण केले. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर या प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस महाले तपास करत आहेत.
Source link
पुण्यात अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने खून:बहिणीशी वाद झाल्याने टोळक्याने केले वार; सात जणांविरुद्ध गुन्हा