![]()
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने एका टॉक शोमध्ये ‘देशात आता शांतता वाटत नाही’ असे विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपकडून संजय दत्तवर जोरदार टीका होत असतानाच, आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मात्र संजय दत्तच्या या विधानाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. “संजय दत्तचे विधान अजिबात चुकीचे नाही, आज देशातील प्रत्येक व्यक्ती असुरक्षिततेची भावना अनुभवत आहे,” असे म्हणत पटोले यांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईत रोज खून होतायत’ प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी मुंबईतील गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या आणि मेट्रोपॉलिटन शहरात जगभरातून लोक राहायला येतात. पण आज तिथेच सर्वाधिक असुरक्षितता आहे. मुंबईत रोज खून आणि हत्यांसारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे तिथे लोकांचे जगणे अक्षरशः परेशान झाले आहे.” कलाकारांना बिश्नोई गँगच्या धमक्या कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पटोले पुढे म्हणाले, “अशा भयंकर परिस्थितीत मुंबईत राहणाऱ्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना असुरक्षित वाटणे अत्यंत साहजिक आहे. त्यांना कधी बिश्नोई गँगसारख्या गुंडांकडून थेट धमक्या दिल्या जातात, तर कधी इतर गुन्हेगारांकडून त्रास दिला जातो. त्यामुळे संजय दत्तने जे काही म्हटले आहे, त्यात काहीही गैर नाही.” राज्य आणि केंद्र सरकारला सवाल संजय दत्तचे हे विधान म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारसाठी एक मोठा इशारा असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. “जर या देशात आणि राज्यात राहणारे सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील, तर इथल्या सामान्य माणसाची काय अवस्था असेल? याचा विचार सरकारने करायला हवा. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने या असुरक्षिततेच्या भावनेची आणि वाढत्या गुन्हेगारीची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे,” अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
—————- ही बातमी पण वाचा.. भारतात शांतता वाटत नसेल, तर पाकिस्तानात किंवा येरवडा जेलमध्ये जा: भाजप नेते परिणय फुकेंचा संजय दत्तवर हल्लाबोल बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या एका विधानामुळे सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना त्याने “मला आता भारतात शांतता वाटत नाही” असे विधान केल्याचा दावा केला जात आहे. या विधानावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून, भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी संजय दत्तवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. वाढता वाद पाहता संजय दत्तने स्वतः पुढे येत यावर स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा
Source link
सेलिब्रिटीच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय?:संजय दत्तच्या विधानावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल