Headlines

Sanjay Raut Demands 8-Hour Duty For Mumbai Police; Targets CM Shinde


मुंबईसह राज्यभरात घडणाऱ्या वेगवान राजकीय व सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अंमलदार आणि शिपाई वर्गावर प्रचंड ताण आला असून, त्यांची अक्षरशः पिळवणूक होत असल्याची बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी

.

ठाकरे सरकारच्या काळातील ‘8 तास ड्यूटी’चा निर्णय कागदावरच!

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 4 मे 2022 रोजी बृहन्मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक स्थायी आदेश जारी केला होता. अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलिसांना ‘8 तास ड्यूटी आणि 16 तास आराम’ देण्याचे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले होते.”

“आज दुर्दैवाने या शासन निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदावरच उरली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणारा ड्युटीचा रोस्टर (तक्ता) पाहिला, तर पोलीस शिपाई 8-8-8 तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम करत असल्याचे भासवले जाते. मात्र, वास्तवात मैदानावर काम करणाऱ्या सामान्य पोलीस अंमलदाराकडून दररोज 12 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करवून घेतले जाते.”

वरिष्ठांचा नाईलाज, पण पोलिसांचे कुटुंब अन् प्रकृती उद्ध्वस्त!

पोलीस दलातील अंतर्गत वास्तव मांडताना राऊत यांनी नमूद केले. “कनिष्ठ पोलिसांना जास्तीचे तास राबवून घेण्याचे हे प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केवळ ‘तोंडी आदेशा’नुसार चालतात. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने वरिष्ठांचाही नाईलाज होतो, ही वस्तुस्थिती आहे.”

आरोग्यावर गंभीर परिणाम

“सततचे बंदोबस्त, व्हीआयपी ड्युटी, विविध राजकीय पक्षांची आंदोलने आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांना आठवड्याची हक्काची सुट्टीही नीट मिळत नाही. बारा-बारा तास रस्त्यावर उभे राहिल्यामुळे पोलिसांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रचंड दुष्परिणाम होत आहेत. त्यांच्या कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडत असून अनेक पोलिसांना अकाली आजार जडत आहेत.”

हा विषय गांभीर्याने घ्या, माणुसकीने मार्ग काढा!

संजय राऊत यांनी सरकारला आवाहन करताना म्हटले आहे की, पोलीस हा देखील हाडामांसाचा माणूस असून त्यालाही कुटुंबीय आणि स्वतःचे आयुष्य आहे. त्यामुळे कागदावरील ‘८ तास ड्युटी’चा नियम प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी काटेकोरपणे लागू करावा.

मुंबईच्या सुरक्षेचा भार आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या पोलीस बांधवांची ही मूक वेदना लक्षात घेऊन राज्य सरकारने मनुष्यबळ वाढवण्यासह ड्युटीच्या वेळांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करत त्यांनी ठाकरे सरकारच्या काळातील अधिकृत आदेशाची प्रत जोडून सरकारला त्यांच्या जबाबदारीची स्पष्ट जाणीव करून दिली आहे.

——————————————

हेही वाचा…

फडणवीसांचे राजकारण ओहोटीला लागले: शहा इतके घाबरलेत की दिल्लीत घरासमोर सैन्य तैनात, सत्ताधाऱ्यांचा मेंदू ब्रिटिशांसारखा हललाय- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसते. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला दिल्लीत जाणार आहात तिथे आपले स्थान आहे.तर ते स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करुण घेत आहेत. कालचा मोर्च्यात हजारो लोकं एकत्र येत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली, हे काही रडगाणं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतात त्याला रडगाणं म्हणतात, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.